सावंतवाडी :
मोदी@९ अभियांना अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बांदा मंडलात जेष्ठ कार्यकर्ता संमेलन कार्यक्रम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष श्री अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बांदा येथील आनंदी मंगल कार्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी जेष्ठ माग्दर्शक व प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री शरद चव्हाण, जिल्हा संघटन सरचिटणीस श्री प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस व अभियानाचे विधानसभा संयोजक श्री प्रसन्ना देसाई, बांदा मंडल अध्यक्ष श्री महेश धुरी, माजी जि. प सदस्य श्री प्रमोद कामत, माजी जिल्हाध्यक्ष श्री शामजी काणेकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत जाधव, बांदा सरपंच श्रीमती प्रियंका नाईक, माजी बांदा सरपंच श्री अशोक सावंत, बांदा शहर अध्यक्ष श्री नरसिंह उर्फ बाबा काणेकर, तसेच सावंतवाडी विधानसभेतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री दादू कविटकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सावंतवाडी विधानसभेतील 250 जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील 9 वर्षांतील मोदी सरकारच्या जनहिताच्या योजना तळागाळात पोचवण्याबरोबरच शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशा पोहोचतील. यासंबंधी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष श्री अतुल काळसेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अतुल काळसेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांपैकी सर्वात जेष्ठ महीला व पुरुष कार्यकर्त्यांचा सत्कार श्री अतुल काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आला.