१० एप्रिल ला होणारी राष्ट्रीय लोक अदालत स्थगित!

१० एप्रिल ला होणारी राष्ट्रीय लोक अदालत स्थगित!

सिंधुदुर्गनगरी

१०एप्रिल २०२१ला सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालय तसेच तालुका न्यायालय या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदलातीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, यांच्या आदेशाने ही लोक अदालत पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

त्यामुळे १०एप्रिल ला होणारी ही अदालत स्थगित करण्यात आली आहे. याची सर्व पक्षकार,विधिज्ञ,बँक, विमा कंपन्या आणि सर्व संबंधित शासकीय आणि निमशासकीय कार्यालये यांनी याची नोंद घेण्याचं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत करण्यात आले आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा