You are currently viewing लोक अदालतच्या माध्यमातून ६ हजार ३३० प्रकरणे मिटविण्यात यश…

लोक अदालतच्या माध्यमातून ६ हजार ३३० प्रकरणे मिटविण्यात यश…

लोक अदालतच्या माध्यमातून ६ हजार ३३० प्रकरणे मिटविण्यात यश…

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून ६ हजार ३३० प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या माध्यमातून १४ कोटी ८९ लाख ७७ हजार ६७ रुपयांची वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या. अनिता कुरणे यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २०२३ या कॅलेंडर वर्षात झालेल्या लोक अदालती तसेच २०२४ या कॅलेंडर वर्षातील पहिली राष्ट्रीय लोक अदालत ३ मार्चला आयोजित करण्यात आली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या. अनिता कुरणे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या लोक अदालत सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्या समवेत सहाय्यक लोक अभिरक्षक आरती पवार आणि श्वेता तेंडुलकर उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा