शासन आपल्या दारी…..
महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
शासन आपल्या दारी अंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती पुढील प्रमाणे देण्यात येत आहे.
महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर च्या स्वनिधीतून राबविण्यात येणाऱ्या योजना सन 2023-24
योजना क्रमांक-1
1) योजनेचे नांव :- इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (सर्वसाधारण)
योजनेचा उद्देश – ग्रामीण भागात एस.टी.ची सोय नसते किंवा शाळेच्या वेळेत एस.टी. नसते. त्यामुळे मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. चालत जाण्यामुळे बराचसा वेळ वाया जाऊ शकतो. सायकलीमुळे वेळेची बचत होते व मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण थांबते.
2) लाभार्थी निवडीचे निकष
1) लाभार्थी मुलगी ग्रामीण भागातील असावी.
2) लाभार्थी मुलगी इयता 5 वी ते 12 वी मध्ये शिकत असली पाहिजे.
3) लाभार्थीचे वास्तव्य ते शाळा यातील अंतर कमीत कमी 2 कि.मी. किंवा 1 कि. मी. पेक्षा जास्त असावे.
4) अनुदान मर्यादा जिल्हा परिषदेकडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.
योजना क्रमांक –2
योजनेचे नांव- ग्रामीण भागातील इयता 7 वी ते 12 वी पर्यंत शिकणा-या मुलींना संगणक प्रशिक्षणकरीता अनुदान देणे.
योजनेचा उद्देश – ग्रामीण भागातील मुली संगणकाचे ज्ञान घेऊन त्याचे कौशल्य विकसीत करु शकतात. नोकरी व व्यवसायासाठी संगणकाची मदत होते.
लाभार्थी योजनेस पात्र होण्याचे निकष-
1) लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावी.
2) लाभार्थी संगणक परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी.
3) लाभार्थी दारिद्रय रेषेच्या कुटुंबातील असावी. अथवा वार्षिक उत्पन्न रु. 1,20,000/- पर्यंत असावे.
4) अनुदान मर्यादा जिल्हा परिषदेकडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.
योजना क्रमांक 3
1) योजनेचे नांव :- ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (विशेष घटक योजना )
योजनेचा उद्देश- ग्रामीण भागात एस.टी. ची सोय नसते किंवा शाळेच्या वेळेत एस.टी. नसते. त्यामुळे मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. चालत जाण्यामुळे बराचसा वेळ वाया जाऊ शकतो. सायकलीमुळे वेळेची बचत होते व मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण थांबते.
2) लाभार्थी निवडीचे निकष
1) लाभार्थी मुलगी ग्रामीण भागातील असावी.
2) लाभार्थी मुलगी इयता 5 वी ते 12 वी मध्ये शिकत असली पाहिजे.
3) लाभार्थी अनुसुचित जातीतील असल्याचा सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक
4) लाभार्थीचे वास्तव्य ते शाळा यातील अंतर कमीत-कमी 2 कि.मी. किंवा 1 कि. मी. पेक्षा जास्त असावे.
5) अनुदान मर्यादा जिल्हा परिषदेकडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.
योजना क्रमांक –4
योजनेचे नांव- अनुसूचित जातीतील ग्रामीण भागातील इयता 7 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना संगणक प्रशिक्षणकरीता अनुदान देणे.
योजनेचा उद्देश – ग्रामीण भागातील मुली संगणकाचे ज्ञान घेऊन त्याचे कौशल्य विकसीत करु शकतात. नोकरी व व्यवसायासाठी संगणकाची मदत होते.
लाभार्थी योजनेस पात्र होण्याचे निकष-
1) लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावी.
2) लाभार्थी संगणक परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी.
3) लाभार्थी दारिद्रय रेषेच्या कुटूंबातील असावी. अथवा वार्षिक उत्पन्न रु. 1,20,000/- पर्यंत असावे.
4) लाभार्थी अनुसुचित जातीतील असल्याचा सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक
5)अनुदान मर्यादा जिल्हा परिषदेकडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.
योजना क्रमांक –5
योजनेचे नाव- माझी कन्या भाग्यश्री योजना- सुधारीत
योजनेचा उद्देश –
1) मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या
आरोग्याचा दर्जा वाढविणे.
2) एक किंवा देान मुली असणा-या कुटूंबाना मुलींच्या नांवे वैयक्तिक लाभ (रु. 50,000/- किंवा रु. 25,000/-)
माझी कन्या भाग्यश्री- सुधारीत योजनेच्या अटी व शर्ती.
1) ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखापर्यंत आहे अशा सर्व घटकातील लाभार्थ्यासाठी ही योजना लागू आहे.
2) 1 ऑगस्ट 2017 नंतरची पहिली व दुस-या अशा देान्ही मुली लाभास पात्र राहतील.
3) दि. 1 ऑगस्ट 2017 नंतरची एकच मुलगी आहे. व मातेने/पित्याने दोन वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन प्रमाणपत्र व प्रस्ताव सादर केला आहे. अशा मुलीस रक्क्म रु. 50000/- चे मुदतठेव प्रमाणपत्र देय राहील.
4) दि. 1 ऑगस्ट 2017 नंतर दोन मुली आहेत. व एक वर्षाच्या आत माता/पित्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करुन प्रमाणपत्र व प्रस्ताव सादर केला आहे. अशा प्रत्येक मुलींस रु. 25000/- चे मुदतठेव प्रमाणपत्र देय राहील.
5) प्रथम जुळया मुलींनंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास सदर देान्ही मुलींना प्रत्येकी रु. 25000/- लाभ देय राहील.
6) लाभार्थी कुटूंबाने लगतच्या वर्षाचा रक्क्म रुपये 8.00 लाखपर्यतचा उत्पन्नाचा दाखला व रहिवासी (अधिवास) दाखला स्थानिक तहसिलदार यांचा सादर करणे आवश्यक राहील.
7) माझी कन्या भाग्यश्री- सुधारीत योजनेचे अर्ज नजीकचे अंगणवाडी केंद्रात प्राप्त होऊ शकेल.
8) योजनेचा अंतिम लाभ घेताना मुलींचे वय 18 वर्षै पुर्ण होणे तसेच तिने 18 वर्षे पुर्ण होईपर्यत अविवाहित असणे आवश्यक राहील.
संपर्क : संबंधित तालुका पंचायत समिती बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)
रणजित पवार,उपसंपादक जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग