ओसरगाव टोलनाक्यावर सर्वपक्षीय एकवटले…!
तोपर्यंत टोल वसुली न करू देण्याचा इशारा…!
कणकवली
मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाक्यावर सकाळी ८ वाजल्यापासून टोल वसुलीला सुरुवात करण्यात आली मात्र सिंधुदुर्ग वासियांचा या टोल वसुलीला विरोध असतानाच सकाळी 10 वाजता आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता या पार्श्वभूमीवर सकाळी 9 वाजून 55 मिनिटापर्यंत टोल वसुली करण्यात आली .त्यानंतर तांत्रिक मुद्दा पुढे करत टोल वसुली थांबवत असल्याचे संबंधित कोरल असोसिएट राजस्थान या कंपनीचे व्यवस्थापक रोहन डांगे यांनी सांगितले.दरम्यान टोल कृती समितीसह सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी यांनी कोणत्याही स्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एम एच 07 वाहनांना संपूर्ण टोल माफी त्याचप्रमाणे टोल नाक्यावरील समस्या आणि त्रुटी दूर केल्याशिवाय टोल सुरू करू देणार नाही अशी मागणी लावून धरल्याने शेवटी टोल कंपनीच्या व्यवस्थापकाने सदरची टोल वसुली तात्पुरत्या स्वरूपात थांबवत असल्याचे पत्र टोलमुक्त समितीचे पदाधिकारी व राजकीय नेत्यांना सादर केले. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात सिंधुदुर्ग वासियांना दिलासा मिळाला आहे या निमित्ताने सर्वपक्षीयांनी टोलच्या विषयावर समान भूमिका मांडली मात्र प्रत्येकाने आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला.
एक तास 55 मिनिटे टोल वसुली!
कोरल असोसिएट कंपनीने ओसरगाव टोलनाक्यावर सकाळी आठ वाजल्यापासून नऊ वाजून 55 मिनिटांपर्यंत म्हणजे जवळपास एक तास 55 मिनिटे टोल वसुली केली यादरम्यान एसटी व अन्य वाहन चालकांकडून टोल वसुली करण्यात आली सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन होणार असल्याने 5 मिनिटे अगोदर तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत टोल वसुली थांबवली. त्यामुळे दरम्यानच्या काळात ज्या वाहन चालकांकडून टोल वसुली करण्यात आली त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली त्याचप्रमाणे दोन वाहने धडकताना थोडक्यात बचावली.
सर्वपक्षीय विरोध!
महामार्गवरील ओसरगाव येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून टोल वसुली बाबत जाहिर नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार सकाळी 8 वाजल्यापासून टोल वसुली सुरु करण्यात आली त्याला सिंधुदुर्ग टोल मुक्ती कृती समिती व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे , भारतीय जनता पार्टी , शिवसेना , राष्ट्रवादी व कॉग्रेस या सर्व राजकीय पक्षांच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला .
कृती समिती पदाधिकारी दाखल!
सकाळी 10 वाजता टोलमुक्त कृती समितीचे पदाधिकारी टोलनाक्यावर दाखल झाले यावेळी टोल देणार नाही अशा प्रकारचा फलक लावत टोल वसुलीला विरोध असल्याचे सांगत टोल वसुली करू देणार नाही असे समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्यें, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर,नितीन वाळके, अनंत पिळणकर यांनी सांगितले यांच्यासह व्यापारी दाखल या ठिकाणी दाखल झाले होते.
राजकीय नेते व पदाधिकारी दाखल!
शिवसेना आमदार वैभव नाईक , सतीश सावंत,संदेश पारकर, भाजपाचे मनोज रावराणे , मिलींद मेस्त्री , राष्ट्रवादीचे अमित सामंत , कॉंग्रेसचे इर्शाद शेख , शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते दाखल झाले होते. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत कोणत्याही स्थितीत टोल भरला जाणार नाही अशी भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली.
टोल प्लाझावर बसु देणार नसल्याचा इशारा!
त्यावेळी टोल कंपनीचा व्यवस्थापकाकडून जोपर्यंत स्थानिक वाहनांना टोलमाफी व रखडलेले हायवे चे प्रश्न मार्गी लागल्यानंतर टोल वसुली करण्याबाबतचे लेखी आश्वासन घेतले. अचानक पुन्हा टोल वसुली चालु केल्यास कोरल असोसिएटच्या कर्मचा-यांना टोल प्लाझा वर बसु देणार नसल्याचा इशारा सर्व पक्ष यांनी दिला. यावेळी स्थानिकांना टोलवसुली मिळालीच पाहिजे . या मुद्दयावर सर्वाचे एकमत दिसुन आले. टोल वसुली कंपनीचे व्यवस्थापक राहुल डांगे यांनी कृती समितीला राष्ट्रीय प्राधिकरणला दिलेल्या पत्राची कॉपी देवून आपण टोल वसुली करत नसल्याचे आश्वासन दिले .
कार्यकर्त्यांनी ओढत माध्यमांसमोर आणले!
मात्र श्री. डांगे रितसर माध्यमांसमोर पत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याने संतप्त झालेल्या कृती समितीचे संजय मालंडकर, अनंत पिळणकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी ओढत माध्यमांसमोर आणले. यावेळी जोरदार घोषणा देत कृषी संमितीच्या एकजुटीचा विजय असो अशी घोषणा देण्यात आली. त्यानंतर काहीवेळाने टोल वसुली बंद झाल्याने सर्व पक्षीयांचे आंदोलन स्थगित करण्यात आले.
तणाव निवळला!
ओसरगाव येथे टोलवसुलीच्या मुद्दयावर निर्माण झालेला तणाव दुपारी 12 वाजता निवळला त्यानंतर हळूहळू प्रशासनाने पोलिस बंदोबस्त कमी केला. या आंदोलनात कृती संमितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये , व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर , कार्यवाह नितीन वाळके , नंदन वेंगुर्लेकर , संजय भोगटे , दिपक बेलवलकर ,राजू पारकर,विलास कोरगांवकर , नितीन म्हापणकर , बाळू मेस्त्री , सादिक कुडाळकर तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सतिश सावंत , युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , कन्हैया पारकर , रुपेश नार्वेकर , रुपेश आमडोस्कर , प्रमोद मसुरकर,कमलेश नरे, उत्तम राणे,सी आर चव्हाण,संतोष पुजारे , मनोहर पालयेकर भाजपाचे विधानसभा प्रमुख मनोज रावराणे , तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , संदिप मेस्त्री , बबली राणे , सचिन पारधिये , समीर प्रभुगांवकर , शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे , संदेश पटेल , भुषण परुळेकर , राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर , रुपेश जाधव , कॉंग्रेसचे अभय शिरसाट व सर्व पक्षीय व कृती समितीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते . यावेळी प्रशासनाकडून कणकवली नायब तहसिलदार शिवाजी राठोड , पोलिस निरिक्षक अनिल जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांनी स्वखर्चाने पाणी वाटप करत सामाजिक भावनेचे दर्शन घडविले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.