You are currently viewing डेगवे मिरेखण शाळेला ब्लूटूथ स्पीकर भेट

डेगवे मिरेखण शाळेला ब्लूटूथ स्पीकर भेट

बांदा‌

जिल्हा परिषद डेगवे मिरेखण शाळेला शाळेला भालावल शाळेच्या उपशिक्षिका श्रीम. सुरेखा बमू गावडे यांनी रुपये दहा हजार किंमतीचा ब्लूटूथ स्पीकर व2माईक शाळेसाठी भेट दिले.
डेगवे मिरेखण शाळेत मुख्याध्यापक म्हणून आनंद कोळापटे व उपशिक्षक गणेश आत्राम हे माहे फेब्रुवारी मध्ये2022 या शाळेत हजर झाले. श्री. कोळापटे यांनी चार्ज घेतल्या नंतर शाळेमध्ये पालकांच्या, केंद्रप्रमुखांच्या सहकार्याने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. शाळा दुर्गम भागात असून शाळेकडे पक्का रस्ता नाही. असे असून सुद्धा शिक्षकांच्या व पालकांच्या प्रयत्नाने शाळेचा पट 10 वरून 21 झाला.शाळेमध्ये शिक्षकांनी स्वतः खर्च करून रंगरंगोटी करून भिंती बोलक्या केल्या. शालेय परिसर स्वच्छ केला.शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे वैयक्तिक लक्ष दिले जात असून स्पर्धा परीक्षेची तयारी घेतली जाते.शाळेची गरज लक्षात घेऊन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. अंकित धवन यांनी दोन सिलिंग फॅन भेट दिले. दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग यांनी ‌एक मुलगी दत्तक घेऊन तिचे दहावी पर्यंतचे पालकत्व स्वीकारले.
श्री. वागधरे सर शाळा घारपी, श्री. शिंदे सर शाळा डेगवे नं.1, श्री. प्रशांत पवार सर तसेच माजी शिक्षण व आरोग्य सभापती श्री. प्रमोद कामत मित्रमंडळ तर्फे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
भालावल शाळेच्या शिक्षिका श्रीम. सुरेखा गावडे यांनी शाळेची व विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन शाळेसाठी 10000/ किंमतीचा ब्लूटूथ स्पीकर माईकसह भेट देण्यात आल्याबद्दल आभार मानण्यात आले.
असे दाते पुढे येऊन दुर्गम भागातील शाळेच्या विकासात हातभार लावात असल्याबद्दल डेगवे मिरेखण ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका यांच्यातर्फे मानण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा