You are currently viewing वेंगुर्लेत गवा रेड्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान…

वेंगुर्लेत गवा रेड्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान…

संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; तहसीलदारांकडे शिवसेनेची मागणी…

वेंगुर्ले

तालुक्यातील तुळस, होडावडा, मठ, आडेली, वजराठ, मातोंड, पेंडूर, दाबोली, वेतोरा या गावांमध्ये गवारेड्यांनी धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करत आहेत. तरी तत्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेऊन आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
वेंगुर्ले तहसीलदार श्री. ओतारी यांच्या दालनात आज शिवसेना जिल्हा संघटक सुनील डूबळे, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई तसेच संजय परब विभागप्रमुख तुळस, मितेष परब, अरविंद नाईक, होडावडे ग्रामपंचायत सदस्य, मठ माजी सरपंच धोंडी गावडे, श्री. गावडे या सर्वांनी त्यांची भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली.
षगवारेड्यांपासून होणाऱ्या नुकसानीची शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी, अशी ही मागणी यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी यांनी केली. त्याचप्रमाणे तालुक्यातील अनधिकृत वृक्षतोड आणि त्याच्याकडे असलेले वनविभागाचे दुर्लक्ष याकडे सुद्धा तहसीलदार यांचे लक्ष वेधले. आता शाळा सुरू होत असून विद्यार्थ्यांना मिळत असलेले दाखले सर्वर डाऊन असल्यामुळे अपलोड होत नसल्यामुळे ते तात्काळ ऑफलाईन करून द्यावेत अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा