*वेंगुर्लेत भाजपाच्या ” संपर्क से समर्थन ” अभियानाचा प्रदेश उपाध्यक्ष मान.अतुल काळसेकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ*
*पंतप्रधान मोदींच्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीची पोचपावती भाजपा कार्यकर्त्यांना सुखावणारी..अतुल काळसेकर*
मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या सरकारला मे अखेरीस नऊ वर्षे पूर्ण झाली,या पार्श्वभूमीवर भाजपा नेतृत्वाने ‘महा जनसंपर्क अभियान’ सुरू केलेले आहे . सदरच्या अभियानात समाजातील प्रभावशाली व्यक्तींना संपर्क करणे,त्यांना मोदी सरकारच्या नऊ वर्षातील महत्वाकांक्षी योजना , त्यांची अंमलबजावणी ,क्रांतिकारी निर्णय , जगात भारताची कमालीची सुधारलेली प्रतिमा याबाबत अवगत करून मोदींच्या या निस्वार्थ , राष्ट्रप्रेमी कामाला समर्थन प्राप्त करणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष मा अतुलजी काळसेकर यांच्या समवेत आज वेंगुर्ला तालुक्यातील अनेक मान्यवर प्रभावशाली व्यक्तींना भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट दिली.
त्यात जिल्ह्यातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल रँक (79) प्राप्त केलेल्या वसंत दाभोलकर यांचे कुटुंबीय, राष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार अरुण दाभोलकर ,जिल्हा परिषदेचे माजी उप मुख्यकारी अधिकारी सुनील रेडकर , रंगकर्मी व रोटरीचे प्रमुख पदाधिकारी संजय पुनाळेकर , जेष्ठ व्यापारी व समाजसेवक श्री. मनमोहन दाभोलकर ,पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष व तरुण भारतचे प्रतिनिधी प्रदीप सावंत व भरत सातोस्कर यांची भेट घेऊन त्यांना मोदी सरकार च्या योजनांचे पत्रक दिले .
भेट दिलेली मंडळी ही समाजातील प्रतिभावंत मंडळी असून सर्वानी मोदींजींच्या सक्षम कारकिर्दीची खुलेआम प्रशंसा केली . तसेच समर्थन देण्यासाठी 9090902024 या नंबरवर आपल्या मोबाईलवरुन मिसकाॅल दिला .
यावेळी संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार , जेष्ठ नेते बाबा राऊत , युवा मोर्चाचे संदिप पाटील – प्रणव वायंगणकर – कमलेश करंगूटकर , बुथ प्रमुख देवेंद्र राऊळ व रविंद्र शिरसाठ , ओबीसी मोर्चाचे शरद मेस्त्री , सोशल मिडीयाचे ओंकार चव्हाण , हेमंत पेडणेकर , दाभोली ग्रामपंचायत सदस्य अवधूत राऊत व सौ. शामल मिशाळे , अनु. जाती मोर्चाचे विष्णु दाभोलकर , आनंद नवार , सीताराम मिशाळे , संतोष साळगावकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .