वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावचा विद्यार्थी कु.वसंत दाभोलकर हा जिल्हापरिषद शाळेत शिकुन यु.पी.एस.सी.परिक्षेत संपूर्ण देशातून चक्क ७६ वा नंबर पटकावत अखिल भारतीय स्तरावर सिंधुदुर्गचा टॅलेंट चा झेंडा रोवला. प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषद दाभोली शाळा त्यानंतर वेंगुर्ले हायस्कूल मधुन माध्यमिक शिक्षण व त्यानंतर रत्नागिरीच्या फिनोलेक्स मधुन इंजिनिअरिंगची पदवी मिळवणाऱ्या या ग्रामीण भागातील सुपुत्राने दुसर्या प्रयत्नात हे प्रचंड यश मिळवले व आय.ए.एस.अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार केले. याबद्दल भाजपा च्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सदस्य शरद चव्हाण व संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन त्याचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार, जेष्ठ नेते बाबा राऊत, युवा मोर्चाचे संदिप पाटील – प्रणव वायंगणकर – कमलेश करंगूटकर, बुथ प्रमुख देवेंद्र राऊळ व रविंद्र शिरसाठ, सोशल मिडीयाचे ओंकार चव्हाण, हेमंत पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य अवधूत राऊत व सौ.मिशाळे, अनु. जाती मोर्चाचे दाभोलकर , आनंद नवार आदी उपस्थित होते.