*बांद्यातील रोटरॅक्ट क्लबच्या तरूणाईने केली शाळा परिसराची साफसफाई*
*बांदा*
गेल्या दीड महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेल्या शाळांची सन२०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात गुरूवार १५ जूनपासून होत असून जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेची साफसफाई बांद्यातील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांनी शाळा व परिसराची साफसफाई केली.
या स्वच्छता अभियानातअध्यक्ष रो अक्षय मयेकर,उपाध्यक्ष रो संकेत वेंगुर्लेकर,रो रोहन कुबडे,रो निहाल गवंडे,रो साई सावंत,रो दत्तराज चिंदरकर तसेच रोटरी क्लब ऑफ बांदयाचे रत्नाकर आगलावे उपस्थित होते.
यावेळी शाळा ,वर्ग व परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच डेस्क बेंचही स्वच्छ करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, ग्रामपंचायत उपसरपंच जावेद खतीब, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर,पालक मुमताज बांगी, उपशिक्षक शांताराम असनकर,जे.डी.पाटील ,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, मनिषा मोरे आदि उपस्थित होते.
बांद्यातील तरूणाईने राबविलेल्या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी कौतुक केले तरूण वर्गाचे काम सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे मत उपसरपंच जावेद खतीब यांनी व्यक्त केले.