*साहित्यिकांच्या दिंडीने वेधून घेतले भाविक भक्तांचे लक्ष*
पिंपरी
पिंपरी – चिंचवडकर साहित्यिकांनी देहूरोड येथील मुंबई – पुणे रस्त्यावरील कमानीपासून आकुर्डीपर्यंत आयोजित केलेल्या दिंडीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. प्रकाश घोरपडे (संत तुकाराम), सुभाष चव्हाण (संत नामदेव), सुरेश कंक (वासुदेव) आणि संगीता जोगदंड (संत जनाबाई) यांनी तंतोतंत वेषभूषा परिधान करून हातात वीणा, टाळ – चिपळ्या आणि डोक्यावर तुळस घेऊन अभंग, भक्तिगीते गात केलेली वाटचाल असंख्य भाविकांना भावल्यामुळे अनेक भाविकांनी चरणस्पर्श करीत नमस्कार केला; तर तरुणाईने आवर्जून त्यांच्यासोबत मोबाइलमध्ये छायाचित्रे घेत आपले कुतूहल शमविले.
ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, डॉ. पी. एस. आगरवाल, शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर, सुहास घुमरे, सविता इंगळे, अण्णा जोगदंड, कैलास भैरट, फुलवती जगताप, शामराव सरकाळे, शिवाजी शिर्के, सुभाष चटणे, दत्तात्रय कांगळे, योगिता कोठेकर, आत्माराम हारे, रघुनाथ पाटील, रेखा कुलकर्णी, हेमंत जोशी, भाऊसाहेब गायकवाड, सुरेश कोंडे, जयश्री घावटे, संजय गमे, अंबादास रोडे, बाळकृष्ण अमृतकर, प्रकाश ननावरे, अनंत पाठक, मुकुंद जोशी, अशोक वानखेडे, प्रकाश रणदिवे, देवेश रणदिवे, जयविजय जगताप आदी साहित्यिक पारंपरिक वेषभूषा परिधान करून संतवचने, पर्यावरण संवर्धनाची घोषवाक्ये आणि स्वरचित भक्तिगीतांच्या ओळींचे फलक घेऊन ‘ज्ञानोबा माउली – तुकाराम’ , ‘जय जय रामकृष्ण हरी’ असा जयघोष करीत दिंडीत सहभागी झाले होते.
रस्त्याच्या कडेला असलेल्या एका डेरेदार वृक्षाच्या छायेत राजेंद्र घावटे यांनी केलेल्या कविसंमेलनाच्या बहारदार सूत्रसंचालनाखाली सुमारे वीस कवींनी आपल्या आध्यात्मिक रचनांनी भक्तिरसाचा परिपोष करीत भाविकांना सुमारे एक तास खिळवून ठेवले. सरोजा एकोंडे, वंदना गायकवाड, दीपाली गोरे, मनीषा उगले, माधवी अवचट, देविका अवचट, योगिता रोडे, पूनम रणदिवे, सविता अवचट, मनाली पाठक, माधवी अवचट यांनी डोईवर तुळशी वृंदावन घेऊन सहभाग घेतला. तसेच सहभागी झालेल्यांनी फुगड्या खेळून वारीचा आनंद घेतला.
अशोक गोरे, तानाजी एकोंडे, एकनाथ उगले, मुरलीधर दळवी, शरद काणेकर, अरविंद वाडकर, अण्णा गुरव, मल्लिकार्जुन इंगळे, शामराव गायकवाड, कैलास अवचट, शामराव साळुंखे यांनी संयोजन केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
संवाद मिडिया*
⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕
डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)
*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*
*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*
📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99114/
———————————————-