You are currently viewing नारायण राणेंच्या खासदार निधीतून कणकवलीत कचरा संकलनासाठी घंटा गाड्या व ट्रॅक्टर

नारायण राणेंच्या खासदार निधीतून कणकवलीत कचरा संकलनासाठी घंटा गाड्या व ट्रॅक्टर

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा पाठपुरावा

कणकवली

कणकवली शहरातील कचरा संकलन करण्याची सुविधा अजून मजबूत होण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून 25 लाखांचा निधी कणकवली नगरपंचायत च्या कचरा संकलन वाहना करीता देण्यात आला होता. यामधून दोन घंटागाड्या व एक ट्रॅक्टर खरेदी करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी याकरिता पाठपुरावा केला होता. माजी नगराध्यक्ष श्री. नलावडे व माजी उपनगराध्यक्ष श्री हर्णे यांच्या मागणीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा 25 लाख रुपयांचा निधी दिला होता. दोन कायझन घंटागाड्या उपलब्ध झाल्या असून येत्या दोन दिवसात ट्रॅक्टर देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती श्री नलावडे यांनी दिली. यामुळे कणकवली शहरातील कचरा संकलन करणे अजून सोपे जाणार आहे. नारायण राणे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. नलावडे व श्री. हर्णे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा