*दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या*
सिंधुदुर्ग :
राज्याच्या गृह विभागाकडून सिंधुदुर्गातील दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट बदलीचा आदेश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अवैध व्यवसाय विरोधात कठोर भूमिका असल्याने या अधिकारी यांची बदली राजकीय दबावाखातर झाल्याची चर्चा आहे.
सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी तात्याराव सोळंके यांची बदली जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झाली आहे. तर कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांची बदली सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणुन बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या रिक्त होणाऱ्या दोन्ही उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर कोणाचीही नियुक्ती नाही. दरम्यान, अवैध व्यवसाय विरोधात कठोर भूमिका घेत असल्याने या अधिकाऱ्यांची बदली झाल्याची चर्चा आहे.