*सिद्धेश गोलांडे यांची स्विट्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड*
पिंपरी
पिंपरी – चिंचवड परिसरातील युवा बांधकाम व्यावसायिक सिद्धेश गोलांडे यांची स्विट्झर्लंड मधील जिनिव्हा येथे दिनांक १६ जून ते १९ जून २०२३ या कालावधीत संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ग्लोबल शेपर्स वार्षिक परिषदेसाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
त्यानंतर स्विट्झर्लंड मधील झुरिच येथे दिनांक २६ जून ते २८ जून २०२३ या कालावधीत संपन्न होणाऱ्या तीन दिवसीय पॉइंट झीरो फोरम २०२३ या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेतही सिद्धेश गोलांडे सहभागी होणार आहेत. सिंगापूरचे उपपंतप्रधान हेंग स्वी कीट आणि स्विट्झर्लंडच्या वित्त विभागप्रमुख करिन किलर सुटर यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे. जागतिक पातळीवरील सुमारे सत्तरहून अधिक बँकर्स, वित्त संस्था या परिषदांमध्ये सहभागी होणार आहेत. डिजिटल अॅसेट्स, डिजिटल संपत्तीविषयक आधुनिक संकल्पना आणि तंत्रज्ञान, जनरेटिव्ह एआयचा वित्तीय क्षेत्रातील संभाव्य वापर, पर्यावरण संवर्धनात वित्त संस्थांचा सहभाग अशा महत्त्वाच्या विषयांवर ऊहापोह आणि मार्गदर्शनपर चर्चा या परिषदांमध्ये घडणार आहेत. विकसित आणि विकसनशील देशांमधील सुमारे साठ अर्थतज्ज्ञ आणि अभ्यासक आपले अर्थविषयक विचार परिषदांमध्ये मांडणार आहेत. भावी काळात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून पिंपरी – चिंचवड येथे सार्वजनिक पातळीवरील आर्थिक सुधारणा, पर्यावरण संवर्धन अशा विषयांसाठी भरीव योगदान आणि आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी या परिषदेचा लाभ होईल, असा विश्वास सिद्धेश गोलांडे यांनी व्यक्त केला आहे.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
*संवाद मिडिया*
⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕
डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)
*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*
*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*
📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99114/
———————————————-