You are currently viewing दोडामार्गात आज मोफत आरोग्य तपासणी, चिकित्सा शिबीर

दोडामार्गात आज मोफत आरोग्य तपासणी, चिकित्सा शिबीर

दोडामार्ग

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान , गोवा , आयुष मंत्रालय , भारत सरकार के अंतर्गत स्वायत्त संस्थान आणि नगरपंचायत कसई दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग येथे आज ११ जूनला मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आलं आहे .

रविवारी ११ जूनला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पिंपळेश्वर हॉल , बाजारपेठ , दोडामार्ग येथे हे शिबिर होणार आहे . या शिबिरात हृदयरोग , उच्च रक्तदाब , हाडांचे व सांध्यांचे आजार , थायरॉईड , अॅलर्जी व दमा श्वसन विकार पक्षाघात , वात विकार , त्वचाविकार , बालरोग , लिव्हर व किडणी विकार , मधुमेह , मूळव्याध , स्त्रीरोग , अन्य जुनाट विकार यावर मोफत तपासणी व मोफत औषधें दिली जाणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन शिक्षण व आरोग्य सभापती गौरी पार्सेकर यांच्याकडून करण्यात आलेय .

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 9 =