You are currently viewing रीळं( Reels )

रीळं( Reels )

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम काव्यरचना*

*रीळं( Reels )*

दिस रात निसत्या
क्लीकडं क्लीकडं करत्यात
कामधंदे न्हाय ह्याना
फकस्त ऱीळं टाकत्यात..
आमच्या येळेस रीळं घेउन
फकस्त गोधड्या शिवायचो
तवा डबडं नव्हतं म्हणुन
मीठ भाकरी तरी खायचो
डबडं घेउन निस्त्या
दिसभर हिंडत्यात
सासुसासऱ्याचं करन्यात
ह्यांचं हातपाय झिजत्यात
शुटींगचा कॅमीरा
घरोदारी हिंडतो
तवा जानवलं की
सुनेवर कमेंटचा पाऊस पडतो..
आमच्या येळेस पाऊस जुनमधी यायचा
आता मात्र तो रोजच पडतो
रिळं पाहुन ह्यांची
तो बी रडतो.. तो बी रडतो..

सोनल गोडबोले

प्रतिक्रिया व्यक्त करा