*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठवणी*
~~~~~~
अजूनही आठवतो आहे
तो रस्ता गल्लोगल्लीचा
वेडावाकडा ओबढधोबड
गावाचा वळणावळणांचा
नाही कधी कुठे रुतला
खडा वाळूत खेळताना
बागडण्याचा छंद आगळा
आनंद होता बालपणाचा
विटीदांडू काठ्या गोट्या
अन सराव नित्य मैदानाचा
अजूनही जपलेला आहे
जीवभाव उरि मित्रात्वाचा
आज पाहता मागे वळूनी
क्षणक्षण आठवे जन्माचा
काय मिळाले काय हरवले
सारा खेळ होता प्राक्तनाचा
जे लाभले समाधान मानले
तोच संस्कार जन्मदात्यांचा
शिकवण वसूधैव कुटुंबकम
हाच एक मुलमंत्र जगण्याचा
~~~~~~~~~~~~~~~
. *वि.ग.सातपुते*
