कुडाळ
संपूर्ण देशभर Modi@9 हा कार्यक्रम राबवला जात असून एक महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण वेगवेगळ्या स्तरातून वेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्याच पार्श्वभमीवर आज शनिवारी १० जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोदी @9 विकास तीर्थ रॅलीचे झाराप झिरो पॉईंट टू…सिंधुदुर्ग नगरी ( ओरोस ) या यादरम्यान रॅली काढण्यात आली. या रलींमद्धे माजी खासदार निलेश राणे यांनी सहभाग घेत,निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या ह्या रॅलीमध्ये हजारो मोटार सायकल स्वरांनी सहभाग घेतला व शेवटी सिंधुदुर्ग नगरी ओरोस चौकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सांगता करण्यात आली.
या सांगता समारंभाच्या वेळी बोलताना निलेश राणे यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर वेगवेगळे कार्यक्रम सुरू असताना सिंधुदुर्गातून हा पहिला उपक्रम राबविण्यात आला आणि यामध्ये भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला मोदींनी दिलेल्या दहा हजार कोटीच्या निधीचा हा मुंबई गोवा नॅशनल हायवे होत असून याच हायवेवरून ही रॅली काढण्यात आली यावेळी निलेश राणे यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला 51% मतांचा कानमंत्र दिला व ही 51 टक्के मतं मिळवल्यानंतर देशात आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही कानमंत्र दिला कुडाळ मालवण विधानसभेची जबाबदारी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा सर्वात मोठा कार्यक्रम हाती घेऊन यशस्वी करण्यात आला त्याबद्दल सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे निलेश राणे यांनी आभार मानले.असेच अनेक कार्यक्रम येत्या महिन्याभरात होणार असून सर्व कार्यक्रमांमध्ये भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार निलेश राणे जिल्हाध्यक्ष राजन तेली माजी आमदार आणि लोकसभेचे प्रमुख संयोजक प्रमोद जठार अशोक सावंत संध्या तेरसे प्रमोद रावणाने रणजीत देसाई प्रभाकर सावंत भाई सावंत विशाल परब संजू परब दादा साईल संजय वेंगुर्लेकर ,नगरसेविका प्राजक्ता बांदेकर,दीपक नारकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा साईल तर आभार प्रदर्शन दीपक नारकर यांनी मानले.