You are currently viewing कणकवलीत मान्सून पूर्व पावसाची सलामी…

कणकवलीत मान्सून पूर्व पावसाची सलामी…

कणकवली

मान्सून पूर्व पावसाने कणकवलीत सकाळी सलामी दिली. सुमारे पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला. या कालावधीत वीज पुरवठाही ठप्प झाला होता. आजच्या पावसाने वातावरणातही गारवा निर्माण झाल्‍याने नागरिकांना दिलासा मिळाला. सकाळी उन आणि काही वेळातच ढगांची दाटी झाल्‍याने पाऊस पडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. या पहिल्‍याच पावसात बच्चे कंपनींनी भिजण्याचा आनंद लुटला. अचानक कोसळलेल्‍या सरींनी हवेत गारवा निर्माण केला. हवामान विभागाने आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्‍त केला होता. दरम्यान आता येती कामांना देखील वेग येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा