ईसीएचएस सिंधुदुर्गनगरी, ओरोस यांचे संघटने तर्फे आभार व्यक्त
ईसीएचएस, सिंधुदुर्गनगरी यांची ओपीडी सुरू होण्याची वेळ सकाळी ०८.०० वाजता असून मेडीकल स्टोअर सुरू होण्याची वेळ १०.३० होती. ओपीडीमध्ये चेकअप ०८.०० वाजता झाल्यानंतर केवळ मेडीसीन घेण्यासाठी रुग्णांना जवळजवळ ११.०० वाजेपर्यंत थांबून रहावे लागत होते.
जिल्हाभरातून येणारे माजी सैनिक असतात त्यांना एस. टी. ने ये जा करावी लागत असल्याने त्रास सहन करावा लागतो. यासाठी इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट सेंटर सिंधुदुर्गच्या वतीने अध्यक्ष-शशीकांत गावडे (Ex-Servicemen Contributory Health Scheme
‘एक्स-सर्विसमैन कंट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम’) यांनी
ईसीएचएस, सिंधुदुर्गनगरी यांच्याकडे मेडीकल स्टोअर सुरू होण्याची वेळ १०.३० होती ती वेळ सकाळी ९.०० वाजता करण्यात यावी हि विनंती यांनी केलेली होती.
संघटनेने केलेल्या विनंती नुसार कर्नल व्ही. के. सिंग (रिटा.) अधिकारी OIC, ईसीएचएस, सिंधुदुर्गनगरी यांनी मेडीकल स्टोअर (औषध वितरण ) सुरू होण्याची वेळ १०.३० होती ती बदलून सकाळी ०९.३० वाजता केलेली आहे याबद्दल ईसीएचएस सिंधुदुर्गनगरी, ओरोस यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त केलेले आहेत.