You are currently viewing सावंतवाडीतील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्रभागांमध्ये सीसीटीव्ही बसवणे गरजेचे – राजू मसूरकर

सावंतवाडीतील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्रभागांमध्ये सीसीटीव्ही बसवणे गरजेचे – राजू मसूरकर

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढत असून मौल्यवान दागिने तसेच किंमतीचीच वस्तू पैसे आपल्या घरामध्ये असतात याचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांना तपास करणे सोपे होण्यासाठी सुमारे ३०-३५ हजारांपर्यंत सी.सी.कॅमेरे लावणे गरजेचे असून यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये मंदिरे मसिद चर्च शाळा कॉलेज हॉस्पिटल शॉपिंग कॉम्प्लेक्स व रहिवासी कॉम्प्लेक्स येथे सी.सी कॅमेरे लावणे गरजेचे आहे. बरेचदा आपल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये व शहरांमध्ये तसेच स्वतः लाखो रुपये खर्च करून त्यांचे बंगले असतात त्यांनी सुद्धा हे सी.सी कॅमेरा लावले तर गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांना या गुन्हेगाराचे मुस्के आवळणे फार गरजेचे आहे

साधारणपणे सी.सी कॅमेरे आपल्या दर्शनी रस्त्याच्या समोर येणाऱ्या जाणाऱ्या यांची सी.सी कॅमेऱ्यांमुळे पाळत ठेवता येईल अनेकदा स्कूटर वरून गळ्यातील चैन मंगळसूत्रे अशी किंमतीचीच वस्तू ते गुन्हेगार हिसकावून चोऱ्या करतात. सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यामध्ये लाखो रुपयाची वस्तू असते परंतु वरील प्रमाणे बऱ्याच प्रभागामध्ये सी.सी कॅमेरे न लावल्याने गुन्हेगारी करणाऱ्या व्यक्तीला याचा फायदा होतो त्यामुळे सर्व नागरिकांनी समाजाचे रक्षण करण्यासाठी मंदिर, मशीद, शाळा, कॉलेज, शॉपिंग कॉम्प्लेक्स व रहिवासी कॉम्प्लेक्स येथे सी.सी कॅमेरे लावल्यास पोलिसांना गुन्हेगार पकडण्यासाठी मदत होऊ शकते.

त्यासाठी सीसी कॅमेरे यांना वाय-फाय इंटरनेट कनेक्शन जोडल्यास ऑनलाईन मोबाईल वरती जेव्हा आपण परगावी गेलो असल्यास किंवा आपली मुले परदेशात किंवा विविध शहरात राहत असल्यास वाय-फाय चा कोड दिल्यास ते प्रक्षेपण आपण थेट पाहू शकतात

आता काही महिन्यांनी होणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीला प्रत्येक पक्षातील उमेदवारांना निवडुन आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असतात
त्यांना संभाव्य उमेदवारांना नागरिकांनी आपल्या आपल्या प्रभागांमध्ये मंदिर, मशीद, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, शॉपिंग, कॉम्प्लेक्स व रहिवासी कॉम्प्लेक्स येथे त्यांच्याकडून सी.सी कॅमेरे लावण्याची यांना गळ घालण्यात यावी असे आवाहन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा