You are currently viewing कुडाळात ६३ अनधिकृत बांधकामे, लवकरच कारवाई करणार – मंदार शिरसाट

कुडाळात ६३ अनधिकृत बांधकामे, लवकरच कारवाई करणार – मंदार शिरसाट

कुडाळ

शहरात ६३ अनधिकृत बांधकामे आहेत त्या कामावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे अशी, माहिती कुडाळचे प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दिली. कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, नगरसेवक किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सई काळप, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेविका अक्षता खटावकर आदी उपस्थित होते.

यावेळी शिरसाट म्हणाले की, कुडाळ शहरात सद्यस्थितीत ६३ अनधिकृत बांधकामे असून यामध्ये आताची १३ आणि मागील ५० असा समावेश आहे. या सर्व अनधिकृत बांधकामांना प्राथमिक स्वरूपात नोटीस पाठविण्यात आली आहे. आता कुडाळ नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी प्राप्त झाले असून, त्यामुळे या सर्व अनधिकृत बांधकामांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशी माहिती शिरसाट यांनी दिली.

ते  म्हणाले, शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर असून यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यासाठी २३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे कुडाळ शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा