You are currently viewing माजी सैनिकांसाठी अनिवासी ऑनलाईन उद्योजकता जागृती प्रशिक्षण……

माजी सैनिकांसाठी अनिवासी ऑनलाईन उद्योजकता जागृती प्रशिक्षण……

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्र, नवी मुंबई यांच्यामार्फत कोरोना संसर्गजन्य रोगाच्या परिस्थितीवर स्वयंरोजगार – उद्योजकतेवर आधारीत नवीन उद्योग संधी व शासनाच्या योजना व उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन होण्यासाठी माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांचे पाल्य यांच्यासाठी पाच दिवसांचे अनिवासी ऑनलाईन उद्योजकता जागृती प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन राबविण्यात येणार आहे.

सदर ऑनलाईन कोर्ससाठी 350 रुपये प्रति प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण शुल्क आङे. माजी सैनिक, विधवा, पाल्य यांनी हा कोर्स केल्यानंतर प्रतिपूर्तीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना खर्चाची प्रतिपूर्ती कार्यालयाकडील कल्याणकारी निधीतून करण्याची तजवीज आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा, माजी सैनिक पाल्य यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 02362-228820 या क्रमांकावर संपर्क साधावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा