You are currently viewing दाणोलीत अपघात झालेल्या साता-यातील “त्या” बोलेरो चालकाचा मृतदेह आढळला …

दाणोलीत अपघात झालेल्या साता-यातील “त्या” बोलेरो चालकाचा मृतदेह आढळला …

आत्महत्या केल्याचा अंदाज; नातेवाईकांकडून घातपाताचा संशय, चौकशीची मागणी…

सावंतवाडी

दाणोली येथे वॅगनार कार आणि बोलेरो पिकप यांच्या झालेल्या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत येथील बावळाट परिसरातील जंगलमय भागात आढळून आला आहे.अभय बापू हंगे (२८) रा.सातारा, असे त्याचे नाव आहे.त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय आहे. मात्र त्याचा घातपात झाला असावा, अशी शक्यता नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित बोलेरो चालकाचा दाणोली येथील घाटात वॅगनर कारला अपघात झाला होता. या अपघातानंतर संबंधितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या कारमध्ये असलेले चौघेजण सुदैवाने बचावले होते. मात्र गाडी पलटी झाल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले. पळून जाण्याचा प्रयत्न असलेल्या त्या चालकाला काही लोकांना थांबवले होते. दरम्यान रात्री उशिरा बावळाट परिसरात त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबतची माहिती विशाल बुधावळे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा