You are currently viewing जी-20 अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन

जी-20 अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन

जी-20 अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन

 सिंधुदुर्गनगरी

‘वसुधैव कुंटुंबकम ’या भारतीय तत्वज्ञानावर आधारित जी-20 summit जनभागिदारी उपक्रमतांर्गत पायाभुत साक्षरता आणि संख्याज्ञान हा विषय केंद्रस्थानी ठेवून 1 ते 15 जून दरम्यान विविध उपक्रम राबवून जिल्ह्यामध्ये जनजागृती करावी असे, आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाच्या प्राचार्य अनुपमा तावशीकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी केले आहे.

‘वसुधैव कुंटुंबकम ’या भारतीय तत्वज्ञानावर आधारित जी-२० summit  दि. 19 ते 22 जून 2023 या कालावधीत पूणे येथे होत आहे. त्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हा विषय केंद्रस्थानी आहे. NEP 2020 नुसार पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान संबंधीत क्षमता 2026-27 पर्यंत प्रत्येक बालकाला साध्य करण्यासाठी राज्यस्तरावर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याची सुनिश्चिती करवण्याची आहे. या अनुषंगाने लोकसहभागातून या विषयावर विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केद्र व राज्य शासनाने केले आहे.

यानिमित्ताने उन्‍हाळी शिबीर, शैक्षणिक खेळ, पालक- शिक्षक सभा, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामसभा, गोष्टी ऐकूया गोष्टी रचूया,चला रांगोळी काढूया, बाहुलीनाटय, काव्य गायन, घोषवाक्य, प्रश्नमंजुषा यांचे आयोजन बोलीभाषेतून शाब्दिक उदाहरण  तयार करणे, फिरते ग्रंथालय, बालसाहित्यकाशी गप्पागोष्टी करणे आणि 14 व 15 जून रोजी शाळा पूर्व तयारीसाठी प्रभात फेरी, प्रवेशोत्सव, नवागतांचे स्वागत, लोकप्रतिनिधींना निमंत्रण असे विविध उपक्रम कार्यक्रम घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जनभागीदारी उपक्रमातंर्गत 1 ते 15 जून 2023 या दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्‍यात आली आहे.जी-20 summit या पार्श्वभूमीवर आयोजित ऑनलाईन बैठकीमध्ये वरील माहिती देण्यात आली. बैठकीत प्राचार्य श्रीमती अनुपमा तावशीकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.मुश्ताक शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उप शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, सर्व डायट अधिकारी, अधिव्याख्याता,सर्व गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्ताराधिकारी, गटसमन्वयक, साधनव्यक्ती, विशेष तज्ञ्ज उपस्थित होते.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थायांच्याकडून राबविण्यात आलेले ठळक निपूण भारत अभियनातील उपक्रम, अध्ययन स्तर निश्चिती मालवणी बोलीतून प्रमाणभाषेकडे या सेतू पुस्तिकेचे निर्मिती, शाळा व्यवस्थापन व पालक यांची भूमिका घडी पत्रिका, इयत्ता पहिली ते तिसरी समाजपूर्वक वाचन सराव पुस्तिका, अंगणवाडी कार्यपुस्तिका, अध्ययन कार्ड निर्मिती, निपुण ध्येय प्रशिक्षण, अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका प्रशिक्षण, शैक्षणिक ग्रामसभा इत्यादी उपक्रम डायट मार्फत घेण्यात आले आहेत.जी-20 अंतर्गत माता-पालक गटांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान व गोष्ट कशी सांगवी याविषयावर उदबोधन वर्ग घेण्यात आला.  घोषवाक्य, शाब्दिक उदाहरणे, काव्यवाचन अशा विविध स्पर्धा शाळापूर्व तयारी अभियान अशा विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा