You are currently viewing बांदा कट्टा कॉर्नर सर्कलवर ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात महिला जखमी

बांदा कट्टा कॉर्नर सर्कलवर ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात महिला जखमी

बांदा

बांदा कट्टा कॉर्नर सर्कलवर दुचाकी व ट्रक यांच्यात अपघात झाला. अपघातात दुचाकी ट्रकखाली येऊन दुचाकीच्या मागे बसलेल्या सुहासिनी काशिनाथ गवस (६०, रा. डोंगरपाल) या जखमी होण्याची घटना घडली आहे.त्यांचे जावई दुचाकी चालवत होते. सदर महिलेवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. अधिक उपचारासाठी गोवा बांबोळीला पाठविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. बांदा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. कट्टा कॉर्नर सर्कल हे अपघात प्रवण क्षेत्र बनले असून दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. सदर अपघात आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =