सावंतवाडीच्या भोसले फार्मसी काॅलेजला “एक्सलंट” मानाकंन…
सावंतवाडीच्या भोसले फार्मसी काॅलेजला “एक्सलंट” मानाकंन…

सावंतवाडीच्या भोसले फार्मसी काॅलेजला “एक्सलंट” मानाकंन…

येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी.फार्मसीला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या मूल्यांकनामध्ये ‘एक्सलंट’ हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. मंडळाशी संलग्न संस्थांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी हे मूल्यांकन करण्यात येते. यामध्ये अध्यापन पद्धत, निकाल, राबविण्यात येणारे शैक्षणिक व इतर उपक्रम, इंडस्ट्रियल व हॉस्पिटल व्हिजिट्स, प्रयोगशाळा भेटी, तज्ञांची व्याख्याने, व्यक्तिमत्व व उद्योजकता विकास कार्यक्रम आदी गोष्टींचा समावेश असतो.

सर्व बाबींची काटेकोर तपासणी केल्यानंतर मंडळामार्फत पूअर, सॅटीस्फॅक्टरी, गुड, व्हेरी गुड, एक्सलंट अशा श्रेणींमध्ये मानांकन देण्यात येते. यापैकी यशवंतराव भोसले डी.फार्मसी कॉलेजला ‘एक्सलंट’ हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. यासाठी प्राचार्य डॉ.विजय जगताप, प्रा.तुषार रुकारी व प्रा.सत्यजित साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कठोर मेहनत घेतली. कॉलेजला मिळालेल्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा