You are currently viewing रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ‘मोदी ॲट ९’ अभियान

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ‘मोदी ॲट ९’ अभियान

केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभा क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न..

 

कुडाळ :

 

केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री ना. नारायणराव राणे यांच्या नेतृत्त्वाखाली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ‘मोदी ॲट ९’ अभियान राबवले जात आहे. यानिमित्त मंगळवार दि. ६ जून रोजी हॉटेल लाईमलाईट येथे लोकसभा क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.

केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ‘कृतज्ञता मास’ साजरा करून मतदारांनी सलग दोन वेळा राष्ट्रसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी ‘मोदी ॲट ९’ हे अभियान देशभर राबवले जात आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. “सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे दूत म्हणून आपली जबाबदारी खूप मोठी आहे. आपण सर्व कार्यकर्त्यांनी सदैव तत्पर राहून लोकसंपर्क वाढवला पाहिजे. जनतेने दिलेल्या संधीचा जनतेला लाभ मिळवून देण्यात आपण कमी पडता कामा नये. विविध उपक्रम सातत्याने राबवून सरकारचा हेतू साध्य केला पाहिजे.” तर या अभियानाचे संयोजक म्हणून ना. नारायणराव राणे यांनी “कार्यकर्त्यांनी गुणात्मक काम करणे काळाची गरज आहे. लोकांना आपलेसे करणे आणि त्यामाध्यमातून सरकारच्या धोरणाला पाठींबा मिळवणे कर्तव्यभावनेने केले पाहिजे. यासाठी पक्षाने दिलेला कार्यक्रम आपली पूर्ण शक्ती पणाला लावून आपापल्या ठिकाणी पार पाडणे गरजेचे आहे. अभियानाच्या प्रगतीवर मी स्वतः लक्ष ठेऊन आहे.” असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या दरम्यान ‘मोदी ॲट ९’ अभियानांतर्गत आजपर्यंतच्या कामकाजाचा आढावा उपस्थित मान्यवरांना देण्यात आला. या बैठकीचे सूत्रसंचालन अभियानाचे सहसंयोजक, मा. आमदार प्रमोद जठार यांनी केले. सदर बैठकीसाठी आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विधानसभानिहाय १४ कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा