You are currently viewing शेतकऱ्यांचा राजकीय छळ

शेतकऱ्यांचा राजकीय छळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*’शेतकऱ्यांचा राजकीय छळ’*

 

*************

पाऊस तू ये

पण आता तोंडी आला घास

जावू नको देवूस

पुन्हा कुणाच मरण

तू डोळे भरून नको पाहूस

 

मागच्या वेळी तू

अवकाळी आलास

नुकसान करून गेलास

त्यानंतर किती पंचनामे झालेत

सारे पाण्यात वाहून गेलेत

 

नुकसानभरपाई तर कुणाच्याच

पदरात पडत नसते

जखमेवर मिठ चोळत असते

सरकारी तोंडातून तर

आश्वासनाचा नुसता

भोंगाच वाजतो

खोटा दिलासा देवून

पळ काढतो

 

तुला माहित आहे ना!

शेतकरी घाम कष्टाचा निपळून

मातीत कर्जाच बिज पेरत असतो

कोंब फुटे पर्यंत

भुक मारत असतो

पण जेव्हा कापणीला पिके येतात

तेव्हा तू अवकाळीच

पांघरून घालायचं

कुणाच्यातरी कपाळाचा

कुंकू पुसताना

तू आभाळातून बघायचं

 

तुझ्यासकट वेदना यातना मरण

शेतकऱ्यालाच घेरत असतात

कोणी एसी गाडीत तर

कोणी विमानात फिरताना दिसतात.

खरत शेतकऱ्यांना

कोणीच भाव देत नसतो

फक्त त्यांचा राजकीय

छळ होत असतो

 

जावूदे….

कुणाच काहीही होवूदे

पावसा यावेळी तू

शेतकऱ्यांसबोत रहायचं

भरपुर पिकू द्यायचं

जे पिकेल त्यातून

थोड पोटाला मिळेल

थोड्याच कर्ज फिटेल

 

पावसा खर सांगु का

शेतकऱ्याला श्रीमंत व्हायच नसतं

मातीत राहून मातीत जगायचं असतं

म्हणून एक घास सुखाचा

आम्हालाही खावू दे

एक जन्मतरी लेकरंबाळांनसोबत

तिर्थयात्रेला जावू दे

 

*संजय धनगव्हाळ*

9422892618

प्रतिक्रिया व्यक्त करा