*शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात शिवायन सादर होणार*
*मिशन आयएएसचा उपक्रम*
अमरावती
हे वर्ष शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आहे .महाराष्ट्र शासनाने एक वर्षभर शिवराज्य विषय महोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. छत्रपती शिवराय यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकादमीच्या मिशन गीत शिवायन हा संगीतमय कार्यक्रम तयार केलेला आहे . या कार्यक्रमांमध्ये छत्रपती श्री शिवराय यांचा जीवनपट सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक तसेच पुणे येथे स्थायिक झालेले व संगीत विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत घाटे व सौ संगीता घाटे ह्या सादर करणार आहेत. डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीतर्फे सात दिवसाचे राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर अमरावती येथे सुरू झाले असून या शिबिरामध्ये बुधवार दि. 7 जून रोजी रात्री नऊ वाजता अमरावती मार्डी रोड वरील श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल जवळील ग्रीन सर्कल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी सुप्रसिद्ध रंगकर्मी सौ. सुनिला संगेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे . याप्रसंगी हा कार्यक्रम तयार केल्याबद्दल अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते प्रा.डाँ. चंद्रकिरण घाटे व संगीता घाटे यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम संपन्न होणार असून त्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. विशेष म्हणजे प्रा.डाँ. चंद्रकिरण घाटे व संगीता घाटे हा कार्यक्रम मानधन न घेता सादर करणार आहेत. मानधन न घेता संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम करणारी ही अद्वितीय जोडी आहे .ज्यांना आपल्या भागात या कार्यक्रमाचे आयोजन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन एका प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.
प्रकाशनार्थ प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन IAS अमरावती
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-