ग्रामपंचायत च्या माध्यमातून व्यवसायभिमुख देण्याची ग्वाही
सावंतवाडी
समाजातील महिला व मुलींनी आत्मनिर्भर बनण्यासाठी व्यवसायाकडे वळावे, यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून व्यवसायभिमुख प्रशिक्षण देण्यात येईल अशी ग्वाही माजगाव सरपंच सौ अर्चना सावंत यांनी दिली. माजगांव ग्रामपंचायतीकडून आयोजित करण्यात आलेल्या १५ दिवसाच्या ” बेसिक ब्युटीपार्लर प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक सौ. नम्रता शिरोडकर यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.
यावेळी उपसरपंच, श्री. संतोष वेजरे, ग्रामपंचायत सदस्य सौ. गिता कासार, श्री. संजय कानसे, श्री. अशोक धुरी,सौ. विशाखा जाधव, सौ. उर्मिला मोर्ये,सौ. मधू कुंभार, सौ. माधवी भोगण, सौ. पूजा गावडे, कु. शितल भोगणे, कु. प्रज्ञा भोगण, श्री. ज्ञानेश्वर सावंत इ. मान्यवर उपस्थित होते.