You are currently viewing प्रसिद्ध नृत्य कोरिओग्राफर व राज्यस्तरीय नृत्यांगना मराठी अभिनेत्री दिपाली शिरसाठ – परब यांचे निधन..

प्रसिद्ध नृत्य कोरिओग्राफर व राज्यस्तरीय नृत्यांगना मराठी अभिनेत्री दिपाली शिरसाठ – परब यांचे निधन..

मसुरे :

 

मसुरे गडघेरा बाजारपेठ येथील प्रसिद्ध नृत्य कोरियोग्रफर, राज्यस्तरीय नृत्यांगना आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री , प्रसिद्ध गायिका दीपाली प्रशांत शिरसाठ परब हीचे आज शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता तिच्या मसुरे येथील राहत्या घरी निधन झाले. शुक्रवारी रात्री उशिरा मसुरे येथील स्मशान भूमीत अत्यसस्कार करण्यात आले या वेळी विविध शेत्रातील मान्यवर उपस्थित होते.दीपालीच्या निधनामुळे मसुरे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

दीपाली परब हिने आता पर्यंत १०० पेक्षा जास्त मराठी हौशी आणि व्यवसायिक नाटकांमध्ये काम केले होते. तसेच जिल्हा परिषद च्या शाळांना मोफत नृत्याचे मार्गदर्शन आणि नृत्य प्रशिक्षण दिले होते. जिल्ह्यामधील विविध जिल्हा स्तरीय नाट्य, नृत्य स्पर्धाना तिने परीक्षकाची भूमिका बजावली होती. मालवण तालुक्यातील होतकरू विद्यार्थ्यांना तिने मोफत नृत्याचे प्रशिक्षण दिले.

दिपाली हिला तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय कला क्षेत्रातील विविध पुरस्कार मिळाले होते.सामाजिक क्षेत्रात मसुरे गावात तिचे मोठे योगदान होते. उत्तम रांगोळीकार म्हणून सुद्धा ती मसुरे गावात प्रसिद्ध होती. विविध शॉर्टफिल्म आणि व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकांना नृत्य कोरियोग्राफर म्हणून सुद्धा दिपाली हिने काम केले होते.दिपाली ही एक उत्कृष्ट अँकर होती. मसुरे गावामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून दिपाली हिने विविध उपक्रम राबविले होते.

तिच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आई ,वडील , भाऊ-बहीण, भाऊजी काका, काकी, आत्या, भाचा, भाची, पुतणी असा मोठा परिवार आहे. मसूरे येथील बबन परब यांची त्या कन्या होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =