*”वास्तव आणि कल्पना यांचा समन्वय आनंददायी!” – प्रा. तुकाराम पाटील*
पिंपरी
“वास्तव आणि कल्पना यांचा समन्वय आनंददायी असतो. ‘प्रवासातील आनंदधून’ या पुस्तकातून याचा प्रत्यय येतो!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी ड्रीमलॅण्ड बँक्वेट हॉल, विशालनगर, पिंपळे निलख येथे रविवार, दिनांक ०४ मे २०२३ रोजी व्यक्त केले. माधुरी विधाटे लिखित आणि संवेदना प्रकाशन निर्मित ‘प्रवासातील आनंदधून’ या प्रवासवर्णनपर ललितसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. तुकाराम पाटील बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, राज अहेरराव, नंदकुमार मुरडे, माजी पोलीस आयुक्त मारुती महेशगौरी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. कैलास कोहिनकर, सहाय्यक वन संरक्षक संजय कडू, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी – पुणे डॉ. शिवाजी विधाटे, ॐ साई टूर्सचे संचालक विनायक गुहे, माजी नगरसेविका आरती चौंधे, खेड पंचायत समिती माजी सभापती सुरेश शिंदे यांची व्यासपीठावर तसेच साहित्य, संस्कृती, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. प्रितेश विधाटे यांनी टिपलेल्या निसर्गाविष्कार, पक्षी, प्राचीन संस्कृतीच्या विविध छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
प्रा. तुकाराम पाटील पुढे म्हणाले की, “आपली नाळ मातीशी जोडलेली असल्याने निसर्गचित्रे पाहून अन् निसर्गवर्णन वाचून आपल्याला मनस्वी आनंद होतो!” अरुण बोऱ्हाडे यांनी, “माधुरी विधाटे यांनी आपल्या लालित्यपूर्ण शैलीतून पर्यटनाची आनंदधून मांडून वाचकांना अवर्णनीय आनंद दिला आहेच; पण त्याचबरोबर त्यांनी जपलेली संवेदनशीलता अन् मानवता मनाला भावते!” असे गौरवोद्गार काढले. लेखिका माधुरी विधाटे यांनी आपल्या मनोगतातून, “सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या सासवड या गावातून मिळालेल्या लेखनाच्या बाळकडूला आईवडील, गुरुजन, आप्तेष्ट आणि विवाहपश्चात पती, सर्व कुटुंबीय आणि साहित्यिक परिवार यांनी प्रोत्साहन देऊन वृद्धिंगत केले. स्मरणरंजनाच्या आनंदक्षणांना पुस्तकरूपाने वाचकांपर्यंत पोचवताना कृतार्थ झाल्यासारखे वाटते!” अशा भावना व्यक्त केल्या. संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे यांचे मनोगत ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर यांनी व्यक्त केले. संजय कडू यांनी, “छायाचित्रण ही एक कला असून त्यासाठी केलेली साधना छायाचित्रांच्या माध्यमातून प्रतीत होते!” असे मत व्यक्त केले. विनायक गुहे यांनी, “जगण्याचा दर्जा आपल्या परिस्थितीवर नाही तर विचारांवर अवलंबून असतो!” असे मत व्यक्त केले. डॉ. शिवाजी विधाटे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.भगतसिंग कदम, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.शशिकांत डुंबरे, पिंपळोली गावाचे सरपंच बाबाजी शेळके, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक दादाभाऊ विधाटे यांची तसेच माधुरी ओक, शोभाताई जोशी, रजनी अहेरराव, मंगला पाटील, संपतराव शिंदे, अश्विनी कुलकर्णी, सविता इंगळे, वर्षा बालगोपाल, अरविंद वाडकर, उज्ज्वला केळकर, शरद काणेकर, चिंतामणी कुलकर्णी या साहित्यिकांची उपस्थिती होती.
विधाटे परिवार आणि निकटवर्तीय यांनी संयोजनात सहकार्य केले. दत्तात्रय भोजने यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली कांबळे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
*संवाद मीडिया*
*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤🩹
✴️ *मान्सून ऑफर* ✴️
*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.
✴️ उत्पादने.
*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*
*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.
*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*
*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)
*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.
*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.
*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक
*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.
*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*
कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*
🌎 Visit: www.mvetcare.com
*Advt link*
———————————————-