You are currently viewing मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्या नागरी सत्कार

मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्या नागरी सत्कार

विविध प्रकल्पांचे होणार भूमिपूजन – जिल्हाप्रमुख अशोक दळवी

सावंतवाडी

येथील जयप्रकाश चौक गाडगे महाराज संकुलन नवीन इमारतीचे भूमिपूजन व अन्य प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर व अन्य मंत्र्याच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार देखील आयोजित करण्यात आला आहे.

तरी सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा