You are currently viewing ती होतीच सौंदर्याची खाण

ती होतीच सौंदर्याची खाण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री प्रज्ञा कुलकर्णी लिखित ज्येष्ठ श्रेष्ठ गुणी अभिनेत्री सुलोचना दीदीसाठी अप्रतिम काव्यरचना*

 

*ती होतीच सौंदर्याची खाण*

 

अखंड ज्योतीसमान

होती तेजस्वी साधना

मुखावरती प्रसन्न भाव

प्रेमळ होत्या सुलोचना

 

देवालयाच्या गाभाऱ्यात

शांतीची जशी अनुभूती

सुलोचनांचे अस्तित्व होते

ज्योत समईची मिणमिणती

 

मोहक चेहऱ्यावरच्या छटा

गुणी वैभवी असायच्या

अभिनय कुठलाही असो,

जिवंत भुमिका वठवायच्या

 

सौंदर्यांची अनोखी देणगी

जन्मतःच तिला लाभलेली

आखीव रेखीव दिसायची

स्मित लकेर ती उमटलेली

 

संपत्ती पेक्षाही दिसायची

ठाई ठाई शालीन सुबत्ता

निर्विवाद सत्य ते हेच की….!

नतमस्तक व्हायची पायी सत्ता

 

अमाप प्रसिद्धी मिळाली पण;

स्थितप्रज्ञतेचा जपलेला वसा

चित्रपट सृष्टीत धीरोदात्त चेहरा

शोधुनही सापडणार नाही असा

 

सौ. प्रज्ञा कुलकर्णी

#राज्ञी

नांदेड

प्रतिक्रिया व्यक्त करा