You are currently viewing पावशीत कामगारांचे मध्यान भोजन घेऊन जाणारा टेम्पो पलटी

पावशीत कामगारांचे मध्यान भोजन घेऊन जाणारा टेम्पो पलटी

पावशीत कामगारांचे मध्यान भोजन घेऊन जाणारा टेम्पो पलटी

कुडाळ

कामगार मध्यान्ह भोजन घेऊन जाणारा टेम्पो पावशी भंगसाळ पुलानजीक पलटी झाला. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

कुडाळ एमआयडीसीतून धुरी हे मध्यान्ह भोजनाचा टेम्पो घेऊन ओरोसच्या दिशेने जात होते. त्यावेळी भंगसाळ नदी पुलानजीक वळणावर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. महामार्गावर या अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने चालकाला वाहन नियंत्रण ठेवता येत नाही. आजवर या ठिकाणी १२ अपघात झाले आहेत. त्यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीने येथील दुरुस्ती करून पाणी निचरा करणे महत्वाचे ठरणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा