*कोकण च्या शाश्वत पर्यटन विकासासाठी स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळ ची गरज जिल्हा दोऱ्यावर येणाऱ्या मा.मुख्यमंत्री महोदयांचे सदर विषयी लक्ष वेधणार
श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ.
कोकण असा प्रांत आहे ज्या मध्ये काश्मीर मधला बर्फ सोडून जागतिक पर्यटनाचे निकष पूर्ण करणारा भाग आहे सागरी पर्यटन ,स्कुबा डायव्हिंग ,कृषी पर्यटन,जलक्रीडा ,साहसी पर्यटन,मेडिकल टुरिझम,हिस्ट्री टुरिझम,कातळ शिल्पे,पांडवकालीन लेणी,कल्चर टुरिझम,जंगल सफर,ऐतिहासिक मंदिरे ,गड किल्ले वनराई,अभयारण्य या सर्व पर्यटन क्षेत्रात कोकण स्वतंत्र रित्या विकसित होऊन महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावू शकते .महाराष्ट्र राज्याचा पर्यटन विकास आणि कोकणाचा पर्यटन विकासाचा विचार करता पर्यटन वाढीसाठी आवश्यक संसाधने कोकणात निसर्गतः प्राप्त आहेत आवश्यक आहे तो कोकणाच्या पर्यटन विकासास प्राधान्यक्रम देऊन मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून कोकणातील उद्योजकांना जीवनात राज्य सरकारने क्रांती कारक बदल करण्याचा जे स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळ शिवाय शक्य नाही आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा प्रशासन स्तरावर मान्यता मिळून २५ वर्षापेक्षा जास्त काळ लोटूनही पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आवश्यक ते बदल स्थानिक ,प्रशासन स्तरावर झालेले नाहीत वास्तविक पर्यटन वाढीसाठी पूरक वातावरण असताना स्थानिक व्यावसायिकांना पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक बदल ,नियमावली ,शासकीय अध्यादेश होणे गरजेचे होते परंतु महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी या क्षेत्रात स्थानिक व्यावसायिकांना समाविष्ट करून त्यांचे दरडोई आर्थिक उत्पन्न वाढवणारी एकही योजना गेल्या २५ वर्षात राबवू शकले नाहीत अपवादासाठी न्याहरी निवास ही योजना रजिस्टर होण्यासाठी ५००० रुपये स्थानिक होम स्टे धारकाकडून आकारून त्या बदल्यात पर्यटकांचे निवासाचे बुकींग देण्यात येईल असे सांगून ही गेल्या २५ वर्षात एकही व्यावसायिकास एकही निवासासाठी बुकींग दिले नाही .कृषी पर्यटन पॉलिसी बनली परंतु त्या मध्ये कोकणच्या शेतकऱ्याचा विचार करून पॉलिसी बनविणे गरजेचे होते .जलक्रीडा पॉलिसी चा विचार करता ही स्थानिक पर्यटन व्यावसायिक कुठल्या क्षमतेची बोट चालवतात आणि कुठल्या क्षेत्रात व्यवसाय करतात त्या प्रमाणे पॉलिसी बनणे गरजेचे आहे त्या कोकणात पर्यटन क्षेत्रात क्रांती घडविणारा सी वल्ड सारखा प्रकल्प प्रशासक्रीय मानसिक ते मुळे थांबलेलेला आहे .पर्यटन व्यवसाय वाढीसाठी कोकणच्या जनतेसाठी आवश्यक त्या नियमावली अनुसरून राज्य सरकारच्या वतीने शासन आपल्या दारी या दिनांक ६ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मा .मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबानी स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळ जाहीर केल्यास येणाऱ्या काळात कोकणच्या जनतेसाठी राज्य सरकारचा हा निर्णय कोकणच्या आर्थिक सुबत्तेसाठी महत्वाचा ठरेल या संबंधी पर्यटन महासंघ मा.मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधणार असून कोकण विकासासाठी काम करणाऱ्या नागरिक ,संस्था यांनी महासंघा सोबत राहावे असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे करण्यात येत आहे अशी माहिती पर्यटन महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली आहे .