You are currently viewing “एक तास राष्ट्रवादीसाठी” उपक्रमा अंतर्गत भालावलमध्ये बैठक…

“एक तास राष्ट्रवादीसाठी” उपक्रमा अंतर्गत भालावलमध्ये बैठक…

“एक तास राष्ट्रवादीसाठी” उपक्रमा अंतर्गत भालावलमध्ये बैठक…

सावंतवाडी

आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या माध्यमातून भालावल येथे “एक तास राष्ट्रवादीसाठी” हा उपक्रम राबविण्यात आला. महिला कोकण अध्यक्षा अर्चना घारे यांच्या प्रमुख उपस्थित पक्षाची ध्येय धोरणे व आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी योग्य ते प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सुमित्रा परब, रमेश परब, नीता परब, अशोक परब, प्रियंका राऊळ, सावित्री परब, छाया परब, द्रौपदी पतासे, विनायक परब, बाळा परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा