You are currently viewing युगांतर

युगांतर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री सौ.माया कारगिरवार लिखित अप्रतिम कविता*

 

         *युगांतर*

 

होतास तूच मनात युगायुगांपासून

अवचित गवसलास जणू कृष्ण बनून

.

जन्मोजन्मीचे नाते हे तुला मलाच ठावे

स्नेहाच्या दीपज्योतीने असेच तेजाळत जावे

तुझे नी माझे अनुबंध साद देती अजून होतास तूच मनात युगा युगांपासून !!

 

रेखीले चित्र मी जसे माझ्या अंत:स्थळी

अगदी तसाच भासलास या कातर वेळी

काया मोहरली बघ जणू राधा होऊन

होतास तूच मनात युगा युगांपासून..! !

 

चित्ती असतो सदा तुझाच ध्यास

तुझ्या निळाईत रंगते राधेची आस

तुझ्या आठवांचे दीप मंदिरी

लावते अजून

होतास तूच मनात युगानयुगांपासून..!

 

नको वियोग पुन्हा ,नको ना आता दुरावा

हा गर्भरेशमी बंध ,जन्मोजन्मीचा

ठरावा

मर्मबंधातली ठेव ही, ठेव आता जपून

होतास, तूच मनात युगायुगांपासून ..! !

 

 

सौ. माया कारगिरवार मुंबई. 🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा