वैभववाडी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वैभववाडी तालुकाध्यक्षपदी श्री.तेजस साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र वैभववाडी तालुका शाखा कार्यकारिणीची सभा संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी तालुका अध्यक्ष कुमार स्वामी यांनी मागील वर्षभरातील कार्याचा आढावा सादर केला. संस्थेकडे लेखी स्वरूपात आलेल्या तक्रारी व त्यांचे निराकरण, वीज वितरण कंपनी, बॅक ऑफ इंडिया, बस स्थानक इत्यादी बाबत करावयाचा पत्रव्यवहार यावर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर बहुमताने तालुका शाखा कार्यकारिणीची पुनर्बांधणी करण्यात आली.
अध्यक्ष- तेजस साळुंखे
उपाध्यक्ष – इंद्रजित परबते
संघटक – जयवंत पळसुले
सहसंघटक – तेजस आंबेकर
सहसंघटक(महिला)- श्रीम. संपत्ती चौगुले
सचिव – विवेक मालवणकर
सहसचिव – कुमार स्वामी
कोषाध्यक्ष – सचिन सावंत
प्रसिद्धी प्रमुख – मंदार चोरगे
सल्लागार – ॲड. उत्तम सुतार
सल्लागार : शैलेन्द्रकुमार परब
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यातील सर्वसामान्य ग्राहकांच्या समस्या लोकशाही मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या चळवळीमध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नूतन अध्यक्ष श्री. तेजस साळुंखे यांनी सांगितले.