You are currently viewing महराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी कुडाळ केंद्रावर परीक्षा

महराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी कुडाळ केंद्रावर परीक्षा

महराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी कुडाळ केंद्रावर परीक्षा

सिंधुदुर्गनगरी  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 रविवार दिनांक 4 जून रोजी जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील  संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ आणि कुडाळ हायस्कूल, कुडाळ ज्युनिअर कॉलेज या 2 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार असल्याची, माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली.

            ही परीक्षा दोन सत्रामध्ये (परीक्षेची वेळ सकाळी 10 ते दुपारी 12 आणि  दुपारी 3 ते सायं. 5) यावेळेत घेण्यात येणार असून परीक्षेसाठी एकूण 591 उमेदवार परीक्षेस बसणार आहेत.

 या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना

            आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येईल. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षांकरीता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी(Frisking) करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणारवर लक्ष्य ठेवणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा