You are currently viewing जन्म तारीख १\६ (एक जून)

जन्म तारीख १\६ (एक जून)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जन्म तारीख १\६ (एक जून )* 

 

गरीबाच्या घरात

मुल आले जन्माला

वाढदिवस मात्र

कधीच साजरा नाही झाला

पंचाईत पडली बापाला

जेंव्हा गेला मुलाचं

शाळेत नाव टाकायला

जन्म तारीख सांगता येईना

फक्त म्हणतो ,

मुलगा पाच वर्षाचा झाला

घेऊन आलो शाळेत शिकायला

लिहा की तारीख

पाच वर्षांपूर्वीची

जवळपासची १\६

तेव्हा पासून कागदोपत्री

जन्म तारीख १\६

तसंतर गरीबाचं पोर रोजच मरतं

रोजच पुन्हा

नविन जन्म घेऊन

जगायचं शिक्षण घेतच राहतं

आणि

रोजच दारूच्या गुत्त्यावर

वाढदिवस मनवतं

गरीबाची लाचारी

सरकारला, पैसेवाल्यांना

नाही कळायची

त्यांच्या रोजच्या

मरणाच्या सरणावर

यांची दाळ शिजत असते

गरीबाच्या पोटातली भाकरी

रोजच जळत असते

बाप नाही शिकला

म्हणून पोरगं पण नाही शिकत

संसाराचा रहाट गाडा

ओढण्यात आयुष्य जातं

मात्र,

पोराची जन्म तारीख

नाही आठवत

शाळेत पोराला घालतांना

१\६ आठवते

आणि तीच मग

कागदोपत्री पत्री होते

गरीबाची जन्म तारीख

१\६ असते

शाळेत नाव घालतांना

पाच वर्षा पूर्वीची

पाच वर्षा पुर्वीची.. ……

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर ,धुळे.*

7588318543.

प्रतिक्रिया व्यक्त करा