अमरावती दिनांक १ –
दिल्लीच्या शंभर टक्के निकाल देणाऱ्या सुप्रसिद्ध मालुका आयएएस अकादमीचे मुख्य प्रशिक्षक श्री प्रशांत भाग्यवंत हे रविवार दिनांक 4 जून रोजी अमरावतीला येत आहेत .त्या निमित्ताने त्यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीने मिशन आयएएस अंतर्गत आयोजित केलेला आहे .ज्या विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावीनंतर आयएएस व्हायचे आहे किंवा जे विद्यार्थी आयएएसच्या परीक्षेला बसलेले आहेत तयारी करीत आहेत किंवा ज्यांना तयारी करावयाची आहे त्यांनी अधिक माहितीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.
श्री प्रशांत भाग्यवंत यांनी तीन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा दिलेली असून तिन्ही वेळा त्यांची मुलाखतीसाठी निवड झाली आहे. आपल्या भागातील मुले मोठ्या संख्येने प्रशासनात जावी यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर असे विद्यार्थी कमी कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात या भावनेने ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. अमरावतीच्या कार्यशाळेपूर्वी ते शनिवार दिनांक 3 जून रोजी नागपूर येथील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते उपलब्ध राहणार असून आपल्या नागपूरच्या मुक्कामात ते स्पर्धा परीक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती ह्या शासकीय संस्थेचे महासंचालक व अमरावतीचे सुपुत्र श्री राजेश खवले यांच्याशी महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेच्या राबवणाऱ्या विविध उपक्रमाबाबत चर्चाही करणार आहे .त्यांच्या या दौऱ्याचे आयोजन अमरावतीच्या डाँ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने केलेले आहे.
==============
*प्रकाशनार्थ प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती* 9890967003