You are currently viewing वाफोली ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

वाफोली ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

सावंतवाडी:

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाफोली ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच या निमित्ताने १२ वी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सुपारीच रोप व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला.

यावेळी महिलांचा सन्मान करण्यात आला. उपसरपंच विनेश कृष्णा गवस यांच्या हस्ते सौ.स्नेहलता दत्ताराम वारंग व सरपंच उमेश शिरोडकर यांनी सौ.मीनाक्षी गंगाराम सामंत यांचा शाल श्रीफळ,सन्मानचिन्ह व रोख ५०० रू.देत सन्मान करण्यात आला. उत्तीर्ण विद्यार्थी जतिन महेश देसाई, वैष्णवी संतोष देसाई, कनिष्का नकुळ गवस, आकांक्षा अजय गवस, साक्षी नंदकुमार गवस, स्नेहा विजय गवस, विनायक संजय नाईक, यश नारायण गवस, सिद्धेश रघुनाथ भोगटे, धनश्री अर्जुन खडपे, प्रज्योत प्रमोद गवस, राणी रवींद्र कांबळे, मंदार सातू गवस, साहील सुनील कळंगुटकर, अभि सूर्यकांत कोरगावकर, दत्तप्रसाद श्रीकृष्ण ठाकूर, दीक्षा प्रभाकर गवस उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष म्हणून श्री उमेश शिरोडकर, उद्घाटक श्री दत्ताराम भिकाजी वारंग लाभले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अभिजित महाले, प्रा.उमेश परब व प्रा. रमाकांत गावडे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थांना डॉ.महाले, प्रा. परब, प्रा.गावडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सौ.वारंग मॅडमनीही आपल्या जीवनातील काही आठवणींना उजाळा देत प्रत्येक क्षणी आपण आपली शालेय जीवनात तयारी करण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे आजचा अभ्यास आजच करा तो उद्याला ठेऊ नका असा मोलाचा सल्ला देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्थाविक प्रसाद ठाकूर यांनी केले. तर उपसरपंच विनेश गवस यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

याप्रसंगी ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, व्हा.चेअरमन अनिल गवस, ग्रामपंचायत सदस्य मंथन गवस, मंजुळा शेगडे, स्नेहा आईर, अमित कळंगुटकर, डाटा ऑपरेटर वैभवी देसाई, आशा सेविका ऋतुजा गवस, ज्योती सावंत, अंगणवाडी सेविका तृप्ती परब, सुवर्णा नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी संदीप धुरी, लवू कांबळे सह आदी ग्रामस्थ, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा