You are currently viewing वेंगुर्ला येथील आर. सी. रेगे ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थी दिन साजरा

वेंगुर्ला येथील आर. सी. रेगे ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थी दिन साजरा

वेंगुर्ला :

 

समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व बार्टी यांच्यावतीने आर. सी. रेगे ज्युनिअर कॉलेज वेंगुर्ला येथे विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोकटे, शिक्षक बोवलेकर, समतादूत सुजित जाधव तसेच विद्यार्थी उपस्थित होते. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतापसिंह हायस्कूल राजवाडा चौक जिल्हा सातारा येथे शाळा प्रवेश झाला. हा दिवस महाराष्ट्र शासनाच्यावतीने विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी शिक्षक बोवलेकर व सुजित जाधव यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दिनाविषयी माहिती दिली. सोबत स्कॉलरशिप याबाबत देखील माहिती दिली. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =