You are currently viewing जूनपर्यंत हिवताप प्रतिरोध महिना

जूनपर्यंत हिवताप प्रतिरोध महिना

जूनपर्यंत हिवताप प्रतिरोध महिना

सिंधुदुर्गनगरी

हिवताप या किटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणी करीता त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त होणे आवश्यक आहे. या दृष्टीने समाजातील  सर्व स्तरावर किटकजन्य आजाराबाबत आरोग्य शिक्षण मिळावे या करीता माहे जून 2023 हा महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा  करण्यात येत आहे. अशी माहिती डॉ. आर.एस. कर्तस्कर यांनी दिली.

हिवताप या आजाराबाबत थोडक्यात माहीती

            हिवताप या आजाराचा प्रसार अॅनाफेलीस या डासांच्या मादी मार्फत होतो. निसर्ग निर्मित स्थाने भातशेतीस्वच्छ पाण्याची डबकीनदीपाण्याच्या टाक्याकालवे इ. तसेच मानव निर्मित डासोत्पत्ती स्थाने नारळांच्या करवंट्याटायरउघड्यावर पडलेल्या रिकामी बाटल्याप्लास्टीक डबे ईत्यादी. या ठिकाणी स्वच्छ साठुन राहीलेल्या पाण्यात डासाची मादी अंडी घालते. हिवताप प्रसारक डासाची मादी स्वच्छ पाण्यात सुमारे 150 ते 200 अंडी घालते. अंडीअळी कोषप्रौढ डास हे डासाचे जीवनचक्र अंडी घातलेल्या ठिकाणीच 8 ते 10 दिवसात पुर्ण होते. हिवताप हा प्लाझमोडीयम या परोपजीवी जंतु पासुन होतो प्रौढ मादी डास दुषित हिवताप रुग्णांस चावतो त्यावेळीस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात. व डासाच्या शरीरात हिवतापाच्या जंतुची वाढ होते. डास निरोगी व्यक्तीस चावल्यास ते जंतु डासाच्या लाळेवाटे निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. मानवी शरीरात 10 ते 12 दिवसात जंतुची वाढ पूर्ण होते. या कालावधीस अधिशयन कालावधी म्हणतात. शरीरात जंतुची वाढ पूर्ण झाल्यावर रुग्णास हिवतापाची लक्षणे दिसाण्यास सुरवात होते.

            हिवताप हा प्लाझमोडीयम या परोपजीवी जंतु पासून होतो हिवतापाच्या जंतुचे फॅलसिफेरम व व्हायवॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात.

            हिवताप आजारांची सर्वसाधारण लक्षणे:- थंडी वाजून ताप येणेसतत ताप किंवा एक दिवस आड ताप, तापानंतर घाम येऊन अंग गार पडतेडोकेदुखी व बऱ्याच वेळा उलट्या होतात. फॅलसिफेरम प्रकारच्या हिवतापात वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास मेंदूचा हिवताप होवू शकतो. मेंदुचा हिवताप (Cerebral Malaria) लक्षणे:- तीव्र ताप येणे. तीव्र डोकेदुखी उलट्या होणे मान ताठ होणेझटके येणेबेशुध्द होणे. वेळेत उपचार न मिळाल्यास प्रसंगी मृत्यु होऊ शकतो.

हिवताप रोग निदान:-

            प्रयोगशाळेत हिवतापसाठी रक्तनमुना तपासणी करून घेणे. तात्काळ निदान पध्दतीत (RDK) रक्तनमुना घेवून हिवतापाचे त्वरीत निदान करता येते. ताप आलेल्या प्रत्येक रुग्णाने नजिकच्या शासकिय रुग्णालयात जावून तपासुन घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळून आल्यास शासकिय दवाखाने उदा प्रा. आरोग्य केंद्रग्रामीण रुग्णालयेउपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालया मधून  मोफत संपूर्ण औषधोपचार देण्यात येतो.

डास निर्मिती होऊ नये म्हणुन घ्यावयाची काळजी:-

            पाणी साठवून ठेवण्याची भांडी घट झाकुन ठेवा. आठवडयातून एकदा कोरडा दिवस पाळावा. त्यामध्ये घरातील वापरातील पाण्याची भांडी घासुन पुसुन कोरडी करावीत. परीसरातील नारळांच्या करवंट्याटायररिकामी बाटल्या व प्लास्टीक डबे नष्ट करा व त्यामध्ये पाणी साठा होवु देवु नका. घराभोवतालचा परीसर स्वच्छ ठेवा. सांडपाण्याची विल्हेवाटीसाठी शोषखडयाचा वापर करा. आजुबाजुची डबकी बुजवा किंवा वाहती करा. घरात व घराच्या आजुबाजुला कोणत्याही प्रकारचे पाणी (स्वच्छ / घाण) आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस साचुन राहाणार नाही याची दक्षता घ्यावी.  रिकामी न करता येणाऱ्या व ज्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करत नाही अशा

 

 

पाणीसाठ्या मध्ये अळीनाशक औषध टाकावे किंवा गप्पी मासे सोडावेत. गप्पी मासे प्रा. आ. केंद्र स्तरावर मोफत उपलब्ध आहेत.

            डासाचा उपद्रव टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारीः-

            झोपताना मच्छरदाणीचा किंवा किटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करा किंवा डास प्रतिबंधक औषधांचा वापर करावा. घरांच्या खिडक्यांना जाळी बसवासेप्टी टॅक व्हेंटपाईपला जाळी बसवा. नेहमी अंगभर कपडे घालावेत. आपल्या घरी किटकनाशक फवारणी पथक आल्यास संपूर्ण घर फवारून घ्यावे. फवारणी केलेल्या घराची किमान 2 ते 2.5 महिने रंगरगोटी करू नये. प्रत्येक नागरीकाने वरील सर्व उपाययोजनाचा अवलंब केल्यास डासांची निर्मिती कमी होऊन डासामार्फत प्रसार होणारे हिवतापडेंग्युहत्तीरोगझिकाचिकुनगुनियाजपानी मेंदुज्वर या आजारापासून आपण मुक्त होवु शकतो. आरोग्य विभाग जि.प. सिंधुदुर्ग व जिल्हा हिवताप विभागाकडुन किटकजन्य आजार रुग्णात वाढ अथवा उद्रेक होवु नये या करीता खालील प्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.

            आरोग्य सेवेतील कर्मचारी तसेच आशा स्वयंसेवक यांना विविध स्तरावर किटकजन्य आजाराबाबत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. संभाव्य बाधित भाग कार्यक्षेत्रात नियमित सर्वेक्षण व पर्यवेक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे. डासअळी घनता वाढु नये याकरीता अळीनाशकांचा पुरवठा प्रा. आ. केंद्राना करण्यात आलेला असुन जिल्हास्तरावरही साठा उपलब्ध ठेवण्यात आलेला आहे. संशयित रुग्ण शोधण्याकरीता रक्तनमुने व रक्तजल नमुने तपासणी करीता योग्य ते नियोजन करण्यात आलेले आहे. रुग्ण आढळल्यास त्वरीत उपचारासाठी आवश्यक औषध साठा प्रा. आ. केंद्र, ग्रामीण रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालय स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

            उद्रेकग्रस्त भागात किंवा रुग्ण संख्या वाढ झालेस प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता धुरफवारणी यंत्रे, फवारणी पंप साहित्य, किटकनाशक साठा जिल्हा कार्यालयात अदयावत ठेवण्यात आलेला असून आवश्यकतेनुसार मागणी करण्याच्या सूचना प्राथमिक आरोग्य केंद्राना देण्यात आलेल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा