You are currently viewing कोंडये येथील पुलाची तात्काळ दुरुस्ती करा 

कोंडये येथील पुलाची तात्काळ दुरुस्ती करा 

माजी सरपंच अनिल मेस्त्री व ग्रामस्थांची मागणी

कणकवली

कणकवली तालुक्यातील कोंडये येथील झिरो पॉईंट ते तेलीवाडी करंजे रस्त्यावरील कोंडये नदीवरील पूल नादुरुस्त झाले असून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी कोंडये गावचे माजी सरपंच अनिल रामकृष्ण मेस्त्री व ग्रामस्थांनी केली आहे.
कोंडये झिरो पॉईंट ते तेलीवाडी ते करंजे या रस्त्याचे डांबरीकरण व श्री पावनादेवी मंदिराजवळ कोंडये धरण बंधाऱ्याजवळ नदीवर पूल बांधण्याचे काम पंतप्रधान सडक योजना विभागाने केले होते. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीची मागणी पंतप्रधान सडक योजना विभागाचे कार्यकारी अभियंत्याकडे करण्यात आली

कार्यकारी अभियंता यांना भेटून माजी सरपंच अनिल मेस्त्री,निलेश मेस्त्री आणि अनुज जेठे यांनी ही मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली या निवेदनात म्हटले आहे की, कोंडये येथील झिरो पॉईंट ते तेलीवाडी करंजे रस्त्यावर श्री पावणादेवी मंदिराजवळ कोंडये धरण बंधारा येथे नदीवर पंतप्रधान सडक योजनेतून पूल बांधण्यात आला आहे.या पुलाच्या वर जे काँक्रीट घालण्यात आले आहे त्याच्या शीगा बाहेर आल्या आहेत. आजच्या घडीला बाहेर आलेल्या शिगा अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. त्याशिवाय याची वेळेत दुरुस्ती झाली नाही तर आणखी शिगा बाहेर येतील आणि पूल कमकुवत होऊन जाईल.या रस्त्यावरून आता रहदारी खूप वाढली आहे. त्याशिवाय ग्रामदेवता श्री पावणादेवी चे मंदिर बाजूला आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. जिथे शिगा बाहेर आले आहेत त्या वर तात्काळ कॉंक्रीट घालण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा