भारतीय हवाई दलामध्ये फ्लाईंग ऑफिसर पदी नेमणूक झालेल्या प्रज्वल कुलकर्णी यांच्या आई-वडिलांचा मनसेने केला सत्कार….

भारतीय हवाई दलामध्ये फ्लाईंग ऑफिसर पदी नेमणूक झालेल्या प्रज्वल कुलकर्णी यांच्या आई-वडिलांचा मनसेने केला सत्कार….

सौ. शर्मिला राज ठाकरे यांनी धीरज परब यांच्या मोबाईल वरून दिल्या शुभेच्छा….

संरक्षण दलात फ्लाईंग ऑफिसर पदी निवड झालेल्या, आणि प्रतिष्ठित अशा तलवार ऑफ ऑनर मिळवणाऱ्या प्रज्वल अनिल कुलकर्णी यांच्या आई-वडिलांचा फादर्स डे चे औचित्य साधून जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला. ..

परब यांच्या मोबाईल वरून सौ. शर्मिला राज ठाकरे यांनी प्रज्वल च्या आई-वडिलांना शुभेच्छा दिल्या. प्रज्वल च्या पोस्टिंग विषयी सर्व माहीती जाणुन घेतली. तसेच कोकणात आल्यावर नक्की भेटू असे आश्वासन ही दिले ..यावेळी जिल्हाध्यक्ष परब यांनी भारतीय सैन्यासाठी आपण एक उच्च अधिकारी दिला ही बाब जिल्हा वासियांना तसेच महाराष्ट्रासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे .. प्रज्वल च्या मागे आपण आई-वडील म्हणून खंबीरपणे उभे राहिलात, त्याला प्रोत्साहन दिले म्हणून आज आपणा सर्वांना आनंदाचा दिवस बघायला मिळाला असे सांगून, प्रज्वल च्या पुढील वाटचालीसाठी मनसे सिंधुदुर्ग कडून खूप खूप शुभेच्छा दिल्या.

यावेळी शहराध्यक्ष सिद्धेश कुटाळे, उपतालुका अध्यक्ष जगन्नाथ गावडे ,उपविभाग अध्यक्ष विष्णू मस्के, महाराष्ट्र सैनिक आदिलशहा आदी मनसैनिक पदाधिकारी उपस्थित होते….

प्रतिक्रिया व्यक्त करा