You are currently viewing चला आवरु भावभावना

चला आवरु भावभावना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री सायली कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

*चला आवरु भावभावना*

“एका तरुणाने केला आईचा निर्घुण खून…” पेपरातील बातमीचे शिर्षक वाचले आणि माझे मन एकाएकी सुन्न झाले. पूर्ण बातमी वाचून लक्षात आले की केवळ व्यसन करण्यासाठी पैसा दिला नाही म्हणून राग अनावर झाल्याने त्या तरुणाने आपल्या जन्मदात्री आईचा खून केला होता. माझ्या जिवाचा थरकाप उडाला व नकळत डोळ्यात अश्रू तरळून आले. खरेच भावनांचा आवेग आवरता न आल्याने माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो व किती भयानक कृत्य करु शकतो! मनात सहजच विचार येऊन गेला की त्याने रागाला वेळीच आवरले असते तर किती घोर अनर्थ टळला असता व त्याचे आयुष्यही बंदिवास, जन्मठेप व यातनांनी ग्रासले नसते. खरेच मनातील राग, मत्सर, हाव व ईर्ष्या वेळीच आवरणे अतिशय महत्त्वाचे आहे. नाहीतर भावनांच्या आवेशात माणूस वाहत जातो व हत्या, आत्महत्या, बलात्कार व चोरी यांसारखी अघोरी गुन्हेगारी कृत्ये करून स्वतःच्या विनाशाचे कारण बनतो, मानसिक रोगाची शिकार बनतो किंवा व्यसनांच्या आहारी जाऊन आपल्या जीवनाची दुर्दशा करून टाकतो.

पण मनातील भावनांना आवेग आवरावा तरी कसा व ते तितके सहज आहे का कसा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल व तो साहजिकही आहे कारण हल्लीच्या काळात बहुतांशी माणसांच्या मनातील शांती, समाधान, सबुरी, सकारत्मक मनोवृत्ति व दृढ निश्चय यांसारख्या सात्विक गुणांचे प्राबल्य कमी झाले आहे व राग, लोभ, मत्सर आणि हाव यांसारख्या दुर्गुणांची ताकद ही त्यामानाने शतपटीने वाढलेली आहे. तसेच लोकांची सहनशक्ती देखील कमी झाली आहे व लोकांना मुख्यतः लहान मुलांना नाही ऐकायची सवय राहिलेली नाही. ज्या गोष्टीचा मुले हट्ट करतील ती गोष्ट लगेच पालकांकडून पुढ्यात आणून ठेवली जाते व अवास्तव लाडाची मुले शिकार बनतात. मग अशा वेळी एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही की भावना अनावर होतात व मन नैराश्याने ग्रासून माणूस चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता कैक पटीने वाढते. म्हणूनच भावनांना आवर घालण्याचे तंत्र आत्मसात करणे ही काळाची गरज बनलेली आहे.

मनाला शांत तसेच खंबीर बनवणे ही भावनांना आवरण्याची पहिली पायरी आहे असे म्हणता येईल. कोणत्याही परिस्थितित आपला आत्मविश्वास ढळणार नाही व रागाने, संकटाने, टीकेने किंवा प्रलोभनांनी आपले मन विचलित होणार नाही इतके आपण आपल्या मनाला खंबीर बनवले पाहिजे. कठीण समयीदेखील आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवली व परिस्थितीचा
सर्वांगीण विचार करून निर्णय घेतला तर कठीण कोड्याची उकलही सहज शोधता येते फक्त मनातील भय, दुःख व चिंता यांसारख्या भावनांना अटकाव करण्याची कला आपल्याला अवगत असायला हवी.

तसेच दुसर्‍याला दोषीच्या पिंजर्‍यात उभे करुन शोक करीत क्रोधित होण्यापेक्षा नाण्याच्या दोन बाजू असतात हे लक्षात घेऊन नाण्याच्या दुसर्‍या बाजूचाही तटस्थपणे आपण विचार केला पाहिजे व प्रसंगी दुसर्‍याबरोबर स्वतःलाही तराजूत तोलण्याची तयारीही ठेवली पाहिजे. तसेच रागावर नियंत्रण ठेवण्याचे कसबही आपण विकसित केले पाहिजे व भावनांना कायम आपल्या नियंत्रणात ठेवले पाहिजे.

याबरोबरच मुलांचे अनाठायी लाड न पुरवणे व त्यांना कधीतरी ‘नाही’ ऐकण्याचीही सवय लावणे हे सुजाण पालकत्वाचे एक लक्षण मानता येईल. असे केल्याने एखादी गोष्ट न मिळाल्यावर मुलांच्या मनावर आघात होणार नाही व त्यांचे मन विचलितही होणार नाही. तसेच पालकांनी मुलांना लहानसहान गोष्टीत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले तर त्यांची निर्णय क्षमता विकसित होईल व कठीण समयी ते अचूक निर्णय घेऊन सही-सलामत बाहेर पडतील. शिवाय घरातील चर्चेत शक्य असल्यास लहान मुलांनाही सहभागी करुन घेतले पाहिजे व एखाद्या निर्णयात त्यांचे मतही विचारात घेतले पाहिजे जेणेकरुन त्यांचा आत्मविश्वास विचार प्रबळ होईल व त्यांच्या विचारशक्तीसही चालना मिळेल. तसेच ‘तुला हे जमणार नाही’ असे म्हणून मुलांना आव्हानांपासून परावृत्त करण्यापेक्षा लहानपणापासून छोटी छोटी आव्हाने स्विकारण्यास पालकांनी मुलांना प्रोत्साहन दिले व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या मनाची पायाभरणी मजबूत होईल व कितीही मोठे वादळ आले तरी त्यांच्या आयुष्याचा मनोरा न ढासळता तटस्थ उभा राहील.

शिवाय कोणतीही दुःखद घटना ही सुखाचा किंवा आयुष्याचा शेवट असू शकत नाही हे आपण कायम लक्षात ठेवायला हवे.ज्याप्रमाणे रात्र व दिवस ही सृष्टीचक्राची दोन अंगे आहेत त्याप्रमाणे सुख आणि दुःख ही आयुष्याची दोन अंगे आहेत. दुःखाचे अवघड वळण ओलांडले की पुढच्या वळणावर सुख हे नक्की भेटते, फक्त त्यासाठी मनातील भावनांना आपण वेळीच ब्रेक मारला पाहिजे व सुकाणूने मनास विरुद्ध दिशेला वळवले पाहिजे.

तसेच छोट्या छोट्या गोष्टीतही आपण सुख मानले पाहिजे व सतत समाधानी राहिले पाहिजे. दुसर्‍याबरोबर आपली तुलना करण्याने व आपल्याजवळ जे नाही त्याचाच विचार करण्याने दुःख, हाव व मत्सराशिवाय हाती काहीच लागत नाही व आयुष्यातील समाधान संपुष्टात येते. राग, नैराश्य व दुःख या भावनांना वेळीच रफू केले पाहिजे. नाहीतर आयुष्याचे महावस्त्र फाटत जाते व आपल्या हातात चिंधीशिवाय काही शिल्लक राहत नाही. याउलट फाटलेले आयुष्याचे कापड वेळीच रफू केले तर ते पुन्हा पूर्ववत होते व आयुष्यातील नानाविध रंग टिपण्यासाठी सज्जही होते. म्हणूनच शांतीचा दोरा वापरुन प्रत्येकाने आपल्या मनाच्या वस्त्राला संयमाचे ठिगळ लावले पाहिजे व मनाला कायम स्वच्छ व सुंदर ठेवून आत्मविश्वासाने वावरले पाहिजे.

सायली कुलकर्णी.
वडोदरा

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

This Post Has One Comment

  1. sharvari bhagwat

    very good article.

प्रतिक्रिया व्यक्त करा