You are currently viewing जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त किशोरवयीन मुलींसोबत “संकल्प”ची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त किशोरवयीन मुलींसोबत “संकल्प”ची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

*जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त किशोरवयीन मुलींसोबत “संकल्प”ची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

सोमवार २९ मे रोजी म्हाडा कॉलनी मानखुर्द मुंबई येथे संकल्प संस्था आणि कर्मा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच संकल्पचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोरवयीन मुलींसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न करण्यात आली.
सदर कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी कार्यक्रमाच्या समन्वयक वनिता सावंत यांनी उत्तमप्रकारे पार पाडली. कार्यक्रमाला वस्तीतील एकूण ५० किशोरवयीन मुलींचा सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि संकल्प संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या उपक्रमांची आणि मुलांच्या अधिकारां संदर्भातली महत्वाची माहिती दिली.
सविता हेंडवे यांनी व्यक्तिगत स्वच्छता या विषया संदर्भात खेळाच्या व मनोरंजनाच्या माध्यमातून मानवी शरीर रचना कशी असते? किशोरावस्थेमध्ये कोणते मानसिक, शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात. कोणत्या वयात मुलींना मासिक पाळी येते, त्यावेळेस शारीरिक स्वच्छता कशाप्रकारे असावी. कोणत्या प्रकारे आहार घेणे आवश्यक आहे, मासिक पाळी विषयावर समज गैरसमज काय आहेत, स्वतःची काळजी व निगा कशी घ्यावी आणि अंधश्रद्धा यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
सहभागी मुलींपैकी काही जणींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य रत्नाताई सुरवसे, मनीषा व्हटकर यांचे लाभले. उपस्थित सर्व मुलींना कर्मा फाऊंडेशन यांच्याकडून साबरमती कारागृहामधील बंदिवानांनी बनवलेले सॅनिटरी नॅपकिन तसेच संकल्प संस्थेकडून पेन, कोलगेट ब्रश, आणि अल्पोपहार वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वनिता सावंत यांनी केली.

 

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा